Vinesh Phogat Retirement : ठरलं... विनेश फोगाटचे 'चॅम्पियन' म्हणूनच स्वागत होणार! रौप्यपदक विजेत्याला मिळणारा सन्मानही दिला जाणार

Haryana Cm Nayab Saini on Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी भारतीय महिला कुस्तीपटू ॲथलीट विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले.
Haryana Cm Nayab Saini on Vinesh Phogat
Haryana Cm Nayab Saini on Vinesh Phogatsakal
Updated on

Olympic Games Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी भारतीय महिला कुस्तीपटू ॲथलीट विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. तिच्या पदकाच्या सामन्यापूर्वी विनेशचे वजन 100 ग्रॅमने वाढले त्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी तिला अपात्र घोषित केले. दरम्यान, विनेशनेही कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आता हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Haryana Cm Nayab Saini on Vinesh Phogat
Vinesh Phogat Retirement : 'तू हरली नाही तुला हरवलं...' विनेश फोगाटने निवृत्ती घेतल्यानंतर बजरंग पुनियाच्या ट्विटनं खळबळ

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'आमची हरियाणाची धाडसी मुलगी विनेश फोगाटने जबरदस्त कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला हरियाणा सरकार जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देते ते विनेश फोगाटला दिले जातील. आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश!'

Haryana Cm Nayab Saini on Vinesh Phogat
Vinesh Phogat Retirement: "माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई..." विनेशचा धक्कादायक निर्णय, जाहीर केली निवृत्ती

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तिने पहिल्या फेरीतच जपानी कुस्तीपटू युई सुसाकीचा पराभव करत इतिहास रचला. या सामन्यापूर्वी युईने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्व 82 सामने जिंकले होते.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये विरोधी कुस्तीपटू तिच्याविरुद्ध एकही गुण मिळवू शकला नाही. यानंतरही विनेशने तिच्याविरुद्ध 3-2 असा विजय मिळवला. यानंतर तिने युक्रेन आणि क्युबाच्या कुस्तीपटूंचा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.