Hashim Amla Retirement AB de Villiers : दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज हाशिम अमलाने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याने दोन दशके दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाकडून खेळत आपली दैदिप्यमान कारकिर्द घडवली. चार वर्षापूर्वीच अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दरम्यान आता त्याने इंग्लिश क्रिकेट काऊंटी सर्रेला आपण आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
काऊंटी क्लब सर्रेने ट्विट केले की, 'हाशिम अमलाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपली क्रिकेट कारकिर्द संपल्याची घोषणा केली. सर्रेकडून त्याचे आम्ही आभार मानतो.' दरम्यान, हाशिम अमलाने निवृत्ती जाहीर केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि कर्णधार एबी डिव्हिलिर्सने देखील एक भावनिक ट्विट केले.
डिव्हिलिर्स आपल्या ट्विटमध्ये अमलाबद्दल म्हणतो की, 'हाशिम अमला कुठून सुरू करू? हे एवढं सोपं नाहीये. मला काही दिवस, काही महिने किंवा वर्ष लागू शकतं. मी खरंच तुझ्याबद्दल एक पुस्तकच लिहू शकतो. कायम माझ्या पाठीशी उभे राहण्याबद्दल आभार. तू मला कायम सुरक्षित फिल करून देणारा माझा कायम भाऊ राहिला आहेस.'
हाशिम अमलाने आपल्या कारकिर्दित 124 कसोटी, 181 वनडे आणि 44 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 18,672 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. अमला हा कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून त्रिशतक ठोकणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. अमलाने इंग्लंडविरूद्ध जुलै 2012 मध्ये नाबाद 311 धावांची खेळी केली होती. आता हाशिम अमला दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स केप टाऊनचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.
हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.