Ind vs Pak Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान भारत-पाकच्या खेळांडूमध्ये धक्काबुक्की; अन्यायकारक निर्णय सहन न करण्याचा निर्धार

पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल्ला इक्बाल हा रेषेजवळून फुटबॉल थ्रो करीत होता.
Ind vs Pak Football Match
Ind vs Pak Football Matchsakal
Updated on

बंगळूर : सॅफ करंडकातील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत पूर्वार्ध संपायला काही क्षण बाकी असताना भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या हातातून स्वत: फुटबॉल खेचून घेतला. यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले. तणाव निर्माण झाला.

स्टिमॅक यांना लाल कार्ड दाखवण्यात आले. या प्रकरणावर स्टिमॅक यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटले, की माझ्या कृतीबद्दल तुम्ही माझा तिरस्कार कराल किंवा माझ्यावर प्रेम कराल, परंतु मी एक योद्धा आहे आणि अन्यायकारक निर्णयांपासून मैदानावर आमच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी मी पुन्हा तशा हालचाली करू शकतो, असे विश्‍वासाने त्याने सांगितले.

पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल्ला इक्बाल हा रेषेजवळून फुटबॉल थ्रो करीत होता. याचप्रसंगी स्टिमॅक यांनी त्याच्याकडून तो फुटबॉल खेचून घेतला. यानंतर पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना राग आला. भारतीय खेळाडू व पाकिस्तानी खेळाडू यांच्यामध्ये शाब्दिक चकमक घडली.

या सामन्याचे रेफ्री प्रज्वल छेत्री व संबंधित अधिकारी यांनी स्टिमॅक यांना लाल कार्ड दाखवले. त्यानंतर स्टिमॅक यांना उर्वरित सामन्यात रेषेजवळ उभे राहायला देण्यात आले नाही. यामुळे भारतीय फुटबॉल संघाचे सहायक प्रशिक्षक महेश गवळी त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला मार्गदर्शन करीत होते.

Ind vs Pak Football Match
IND vs PAK Football : मी पुन्हा करणार... राड्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांचे ट्विट व्हायरल

आता लढत नेपाळशी

भारतीय संघाने सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवला. यजमान भारतीय संघासमोर अ गटातील लढतीत आता नेपाळचे आव्हान असणार आहे. भारत-नेपाळ यांच्यामधील लढत येत्या रविवारी रंगणार आहे. भारताची साखळी फेरीतील अखेरची लढत २७ जून रोजी कुवेत संघाविरुद्ध होईल.

Ind vs Pak Football Match
ICC Test Ranking Rishabh Pant : सहा महिन्यापासून संघाबाहेर तरी ऋषभ पंत वाचवतोय भारताची लाज

काही बाबींमध्ये सुधारणा आवश्‍यक ः सुनील छेत्री

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने गोलांची हॅट्‌ट्रिक साजरी केली. याबाबत तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोल करणे आव्हानात्मक असते. तुम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत असाल, तरीही गोल करणे सोपे नसते. अर्थात यापुढचा मार्ग सोपा नसणार आहे. आम्हाला काही बाबींमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत, असे सुनील छेत्रीने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.