SA vs AUS : क्लासेनने 26 चेंडूत ठोकल्या 130 धावा; आफ्रिकेच्या 416 धावांना कांगारूंनी कसं दिलं प्रत्युत्तर?

SA vs AUS Heinrich Klaasen
SA vs AUS Heinrich Klaasen esakal
Updated on

SA vs AUS Heinrich Klaasen : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 5 वनडे सामन्याच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात कांगारूंचा दारूण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने तब्बल 416 धावांचे आव्हान उभे केल्यानंतर कांगारूंना 252 धावात गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2 - 2 अशी बरोबरी साधली आहे.

आता मालिकेचा विजेता 17 सप्टेंबरला होणाऱ्या पाचव्या वनडे सामन्यात ठरणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 7 व्यांदा 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

SA vs AUS Heinrich Klaasen
Asia Cup 2023 Final: फायलनपूर्वीच श्रीलंकेची डोकेदुखी वाढणार, तर संघातील बदल भारताच्या पथ्यावर पडणार

दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रीच क्लासेनने धमाकेदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 209 चेंडूत 174 धावा ठोकल्या. त्याने आपल्या या खेळीत 13 चौकार आणि 13 षटकार ठोकले. म्हणजे क्लासेनने आपल्या खेळातील 130 धावा या 13 चेंडूत ठोकल्या. क्लासेन पाठोपाठ डेव्हिड मिलरने 82 धावांची तुफानी खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या 417 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 35 षटकातच संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून एलेक्स कॅरी सोडला तर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. त्यांचा संपूर्ण संघ 252 धावात गारद झाला. कॅरीने सर्वाधिक 99 धावा केल्या.

SA vs AUS Heinrich Klaasen
ODI World Cup : वर्ल्डकपच्या 20 दिवस आधी संघाला मोठा धक्का! सलामीवीरला झाली गंभीर दुखापत, टूर्नामेंटमधून जाणार बाहेर?

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर लुंग एनगीडीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडाने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. माक्रो यानसन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 - 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.