Paris Paralympic 2024: पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम काल केला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने २० पदकं जिंकली आणि टोकियोतील १९ पदकांचा विक्रम मोडला. टोकियोमध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १९ पदके जिंकली होती. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ३ सुवर्ण, ८ रौप्य व १० कांस्य अशा एकूण २० पदकांसह भारत पदकतालिकेत १९व्या क्रमांकावर आहे.
भारताची आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी असून खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. पॅरिसमधील पदकतालिकेत चीन पहिल्या, ग्रेट ब्रिटन दुसऱ्या, तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अॅथलेटि्स क्रीडा प्रकारात भारताचा पगडा भारी राहिला. भारताने अॅथलेटि्समध्ये एकूण १० पदके जिंकली आहेत. बॅडमिंटनमध्ये ५, नेमबाजीमध्ये ४, तर तिरंदाजीमध्ये १ पदक जिंकले आहे. सुमित अंतिल ( भाला फेक) , नितेश कुमार ( बॅडमिंटन) आणि अवनी लेखरा ( नेमबाजी) यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.
निशद कुमार व शरद कुमार उंच उडी, योगेश कथुनीया थाळी फेक, अजित सिंग भाला फेक, सुहास एल.वाय बॅडमिंटन, तुलसीमाथी मुरूगेसन, नरेश नरवाल १० मिटर एअर पिस्तुल यांनी रौप्य पदक जिंकली आहेत. १० कांस्यपदकांमध्ये शितल देवी व राकेश कुमार मिश्र दुहेरी तिरंदाजी, मरियप्पन थंगवेलू उंच उडी, सुंदर सिंग गुर्जर भालाफे, महिलांची १०० मिटर शर्यत प्रीती पाल, महिलांची २०० मिटर शर्यत, महिलांची ४०० मिटर शर्यत दीप्ती जेवानजी, मनिषा रामदास बॅडमिंटन, निथ्या सिवान बॅडमिंटन, रूबीना फ्रान्सीस १० मिटर एअर पिस्तुल, मोना अगरवाल १० मिटर एअर पिस्तूल यांच्या पदकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.