History of Ashes : खरंच अ‍ॅशेस ट्रॉफीमध्ये राख आहे?

वर्तमानपत्रातील बातमी आणि अॅशेस ट्रॉफीची सुरुवात यांच्यात काय आहे संबंध?
Ashes
Ashesesakal
Updated on

क्रिकेट जगतात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची नावे कायम घेतली जातात. मात्र या दोन देशांचा जन्म होण्यापूर्वीपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश क्रिकेट जगतात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आले होते. या दोन कट्टर देशांमध्ये अत्यंत चुरशीने खेळली जाणारी मालिका म्हणजे अ‍ॅशेस. ( Ashes )

टी 20, 100 बॉल्स, टी 10 या क्रिकेटच्या शॉर्टेस्ट फॉरमॅटच्या जगतात आजही अ‍ॅशेस ही तब्बल 5 कसोटी सामन्यांची मालिका आपले वलय राखून आहे. अ‍ॅशेस मालिका सुरु होण्याच्या महिनाभर आधीपासूनच चाहते मालिकेविषयी चर्चा करण्यास सुरुवात करतात. आधी ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशातील क्रिकेट चाहत्यांपर्यंतच मर्यादित होती. मात्र आता जगभरातील क्रिकेट चाहते अॅशेसला फॉलो करतात. ( History of Ashes )

Ashes
Sports News : ख्रिस गेलने निवडले 3 स्टार क्रिकेटपटू

येत्या बुधवारपासून ( 8 डिसेंबर ) 72 वी अ‍ॅशेस मालिका ब्रिसबेन येथे सुरु होत आहे. या मालिकेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. प्रत्येक वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी ही मालिका रंगतदार होते. तसाच या अ‍ॅशेस मालिकेचा इतिहासही रंजक आहे. अनेकांना अशा प्रश्न पडला असेल की कसोटी मालिकांची नावे साधारणपणे महान खेळाडूंच्या नावावर किंवा देशांच्या नावावर असते मग इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( AUS vs ENG ) यांच्यात दर दोन वर्षांनी खेळली जाणारी ही कसोटी मालिका अ‍ॅशेस ( Ashes ) या नावाने का ओळखली जाते? खरंच ही मालिका जिंकल्यानंतर राख असलेली ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. तर या कोसटी मालिकेचा आणि राखेचा काय संबंध आहे हे पाहण्यासाठी आपल्याला या कसोटी मालिकेच्या इतिहासात डोकावावे लागेल.

Ashes
Ashes : पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडची धडाडणारी तोफच निकामी

काय आहे अ‍ॅशेसचा इतिहास? ( History of Ashes )

अ‍ॅशेस मालिकेचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला 1882 मध्ये जावे लागेल. या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका झाली होती. या कसोटी मालिकेचा निकाल ओव्हल कसोटीवर लागला. क्रिकेटचे जनक म्हणवून घेणारे इंग्रज ऑस्ट्रेलियाकडून हरले होते.

हा मालिका पराभव इंग्लिश माध्यमांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यावेळी द स्पोर्टिंग टाईम्स वृत्तपत्राने इंग्लंडच्या पराभवावर उपहासात्मक टीका केली होती. त्यांनी इंग्लंड क्रिकेट ( Cricket ) मरण पावलं आहे अशा आशयाची स्टोरी केली. या स्टोरीमध्ये एक लाईन होती की 'इंग्लंडचं क्रिकेटला जाळून त्याची राख ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवी.'

Ashes
अमेरिकेचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीनची प्रत्युत्तराची धमकी

वर्तमानपत्रातील या एका लाईनने अ‍ॅशेस मालिकेला जन्म दिला. यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलिया दौरा ( Australia Tour ) केला. त्यावेळी या अ‍ॅशेस ( Ashes ) म्हणजे राख खरोखर अस्तित्वात आली. स्टम्पवरील दोन बेल्स जाळण्यात आल्या आणि त्याची राख प्रसिद्ध कलशात ठेवण्यात आल्या. आता जो संघ ही कसोटी मालिका जिंकेल त्याला या कलशाची प्रतिकृती देण्यात येते. कारण खरी ट्रॉफी म्हणजे कलश हा खूप जीर्ण आहे.

जवळपास 100 वर्षांनी मूळ कलश हा लॉर्ड्सवरील ( Lords ) मेरिलोबोन क्रिकेट क्लबच्या ( Marylebone Cricket Club ) संग्रहालयात ठेवण्यात आला.

सध्या अ‍ॅशेस आहेत कोणाकडे?

सध्या अ‍ॅशेस या ऑस्ट्रेलियाकडे आहेत. 2019 ची अ‍ॅशेस मालिका ड्रॉ झाली होती. जवळपास 1972 नंतर अ‍ॅशेस मालिका ड्रॉ झाली होती. ऑस्ट्रेलियाने 2017 ची अ‍ॅशेस मालिका जिंकल्यामुळे ट्रॉफी त्यांच्याकडेच राहिली. नाहीतर जो मालिका जिंकतो तो अ‍ॅशेस आपल्याजवळ ठेवतो. ( History of Ashes )

अ‍ॅशेस ( Ashes ) मालिका सुरु झाल्यापासून ऑस्ट्रेलियाने ती 33 वेळा जिंकली आहे. तर इंग्लंडने 32 वेळी अ‍ॅशेसवर कब्जा मिळवला आहे. अ‍ॅशेसच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 6 वेळा ही मालिका ड्रॉ झाली आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या काही वर्षापासून अ‍ॅशेस मालिकेत आपला दबदबा निर्माण केला होता.

Ashes
India Tour of South Africa : दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर

कांगारुंचे वर्चस्व इंग्लंडने 2005 ला मोडले ( History of Ashes )

ऑस्ट्रेलियाने मध्यंतरीच्या काळात अ‍ॅशेसवर आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यांनी सलग 20 वर्षे अ‍ॅशेस आपल्याकडेच ठेवल्या होत्या. मात्र 2005 ला इंग्लंडने ऑस्ट्रेलियाकडून या अ‍ॅशेस पुन्हा आपल्याकडे आणल्या.

ऑस्ट्रेलियाने 2006 - 07 ला 4 - 0 तर 2013 - 14 ला 5 - 0 ने मालिका जिंकली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून इंग्लंड संघही तगडा झाला आहे. त्यांनी 2019 ला पहिल्यांदाच एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे.

असे असले तरी इंग्लंडला 1986 पासून गाबा कसोटी जिंकता आलेली नाही. मात्र गेल्या जानेवारी महिन्यात भारताने ( India ) ऑस्ट्रेलियाचा गाबावरील 33 वर्षाचे वर्चस्व मोडून काढले होते. त्यामुळे आता इंग्लंड गाबा कसोटी जिंकून 1986 पासूनचे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडून काढणार का हे पहावे लागेल.

Ashes
Kieron Pollard : कायरन पोलार्डची जागा घेणार शाय होप!
टीम इंडियाने दिला इंग्लंडला आत्मविश्वास? ( Team India )

दरम्यान, अॅशेस मालिका सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ( James Anderson ) एक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'आम्हाला माहित आहे की ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात मात देता येते. आता तो पूर्वीसारखा वर्चस्व गाजवणारा संघ राहिलेला नाही. भारताने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मैदान मारले आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात मात दिली आहे. हे काही अशक्यप्राय अभियान नाही.'

अँडरसनच्या या वक्तव्यावरून भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेला मालिका विजय इंग्लंडचाही आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे असे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.