India vs Korea Live : चक दे इंडिया! भारतीय संघाचा विजयी चौकार; 'सरपंच' साहबची डबल सेंच्युरी

Asian Champions Trophy 2024 : भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्या तीन सामन्यांत १६ गोल्स केले आहेत. मलेशियावरील ८-१ असा सर्वात मोठा विजय ठरला होता.
Hockey Asian Champions Trophy
Hockey Asian Champions Trophyesakal
Updated on

Hockey Asian Champions Trophy 2024 India vs Korea Live : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी केली आहे. सलग तीन विजयांची नोंद करून भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आणि आज चौथ्या सामन्यात दक्षिण कोरियालाही पराभूत केले.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय हॉकी संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत सर्वाधिक ४ जेतेपदं जिंकली आहेत. २०१८ मध्ये भारत व पाकिस्तान यांना संयुक्त जेतेपद दिले गेले होते. भारताने (२०११, २०१६, २०१८^, २०२३) चार आणि पाकिस्तानने (२०१२, २०१३, २०१८^) तीन जेतेपद जिंकली आहेत. दक्षिण कोरियाने २०२१ मध्ये बाजी मारली होती.

भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत तिसऱ्यांदा सलग तीन विजयांची नोंद केली आहे. यापूर्वी २०१२ व २०१८ मध्ये भारतीय संघाने हा पराक्रम केला. त्यामुळे आज दोन माजी विजेत्या संघांमधील टशन पाहण्यासाठी सारे उत्सुक होते. अराइजीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये कोरियाने शेवटच्या मिनिटाला यांग जिहूनच्या गोलच्या जोरावर पिछाडी १-२ अशी कमी केली.

तिसऱ्या सत्रात कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला, परंतु हरमनप्रीत सिंगच्या गोलने भारताची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. भारताने ही आघाडी कायम राखताना ३-१ असा विजय पक्का केला. सरपंचा साहब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरमनप्रीत सिंगने २ गोल करून कारकीर्दितील २०० गोल्स पूर्ण केले. त्याचे एकूण २०१ गोल्स झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.