Hockey Asian Champions Trophy: आशियाई क्रीडा स्पर्धेची आजपासून चेन्नईत तयारी! भारत-चीनमध्ये सलामी

Asian Champions Trophy Hockey
Asian Champions Trophy Hockey
Updated on

Hockey Asian Champions Trophy : चीनमधील हांगझाऊ येथे २३ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी आजपासून (ता. ३) भारतातील चेन्नई येथे पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाचा थरार रंगणार आहे. यजमान भारतासह इतर सहभागी पाच आशियाई देश या स्पर्धेद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करताना दिसणार आहेत. भारताचा सलामीचा सामना गुरुवारी चीनशी होणार आहे.

Asian Champions Trophy Hockey
Hockey India : हॉकी इंडियासाठी एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक फार महत्वाचं; नाही तर गाठावं लागेल पाकिस्तान

चेन्नईमध्ये २००७ नंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाला आणखी एक मोठे महत्त्व प्राप्त आहे. आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाला २०११ पासून सुरुवात झाली. तिथपासून आतापर्यंत सहा वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चीन, कतार, जपान, मलेशिया, ओमान, बांगलादेश या देशांना आतापर्यंत आयोजनाचा मान मिळाला, पण भारताला एकदाही या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला नव्हता. यंदा प्रथमच प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात होत आहे. त्यामुळे चेन्नईत खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेसमोर वलय निर्माण झाले आहे.

Asian Champions Trophy Hockey
WI vs IND ODI Series: मालिका जिंकली तरी रोहित टेन्शनमध्ये, 3 प्रश्ने अजून अनुत्तरितच

...तर पाकमध्ये खेळावे लागेल

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, चीनमधील हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवावे लागेल. अन्यथा पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रता फेरीसाठी पाकिस्तानात जावे लागेल.

Asian Champions Trophy Hockey
IND vs WI 1st T20I Playing 11 : तिलक की रिंकू... हार्दिक कोणाच्या डोक्यावर ठेवणार टीम इंडियाची कॅप?

भारत, पाक सर्वाधिक वेळा विजेते

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक सर्वाधिक तीन वेळा पटकावला आहे. भारताने २०११, २०१६, २०१८ मध्ये ही स्पर्धा जिंकली. पाकिस्तानने २०१२, २०१३ व २०१८ मध्ये बाजी मारली. भारत व पाकिस्तान हे २०१८ मध्ये संयुक्त विजेते ठरले होते. मात्र या स्पर्धेच्या गतविजेत्यांचा मान दक्षिण कोरियाला मिळाला आहे. २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये जपानला पराभूत करून दक्षिण कोरियाने विजेतेपदावर हक्क सांगितला होता. भारताने पाकला नमवून तिसरा क्रमांक मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.