Hockey IND vs GER: विश्‍वविजेत्यांकडून भारतीय हॉकी संघाचा पराभव; मालिकेतही घेतली आघाडी

India vs Germany, Hockey Match: विश्‍वविजेता व पॅरिस ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता जर्मनीने बुधवारी भारतावर २-०ने मात केली.
India vs Germany Hockey
India vs Germany HockeySakal
Updated on

India vs Germany Hockey: विश्‍वविजेता व पॅरिस ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता जर्मनीच्या पुरुष हॉकी संघाने बुधवारी यजमान भारतीय हॉकी संघावर २-० असा विजय साकारला.

या विजयासह जर्मनीने दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हेनरिक मर्टगेन्स (चौथे मिनिट) व लुकास वाईंडफेडर (३०वे मिनिट) यांनी जर्मनीसाठी विजयी गोल करीत ठसा उमटवला. भारतीय हॉकीपटूंना मिळालेल्या सात पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही.

जर्मनीच्या हॉकीपटूंनी पहिल्या लढतीच्या सुरुवातीलाच भारतावर वर्चस्व गाजवले. हेनरिक मर्टगेन्स याने सर्कलमधून भारतीय संघाचा बचाव भेदला. त्याने मारलेला फटका क्रिशन पाठक अडवू शकला नाही. जर्मनीने १-० अशी आघाडी घेतली.

India vs Germany Hockey
Hockey India: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेस मुकलेल्या वरुण कुमारला भारतीय हॉकी संघात पुन्हा संधी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.