Indian Women's Hockey Team: बंगळूर, ता. १४ (पीटीआय) ः उद्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी हॉकी इंडियाने महिलांचा ३३ खेळाडूंचा संघ जाहीर केला. हे शिबिर ९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. हे शिबिर बंगळूर येथील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणात (साई) होणार आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही तयारी आहे.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धा बिहारमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या राजगिर स्टेडियमवर ११ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. ही आशियाई अजिंक्यपद स्पर्धा प्रतिष्ठेची आहे आणि त्यासाठी होणारे हे शिबिर तेवढेच महत्त्वाचे आहे, असे महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सांगितले. कमकुवत बाजूंमध्ये प्रगती करणे आणि नवी रणनीती तयार करणे, तसेच जमेच्या बाजू अधिक सक्षम करणे यावर शिबिरामध्ये अभ्यास केला जाईल, असेही हरेंद्र सिंग म्हणाले.
घरच्या मैदानावर आशिया अजिंक्यपद स्पर्धा होत असल्यामुळे आपल्या संघाला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. त्यामुळे आपली क्षमता वाढवण्यासाठी शिबिरात अधिक भर दिला जाईल. तंदुरुस्ती आणि टीमवर्क यालाही प्राधान्य दिले जाईल, असे हरेंद्र सिंग यांनी सांगितले.
भारतीय महिला हॉकी संघ याअगोदर हॉकी प्रो लीगमध्ये सहभागी झाला होता. तेथे अर्जेंटिना, बेल्जियम, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन या बलाढ्य संघांचा सामना करावा लागला होता.
एकीकडे भारतीय पुरुष हॉकी संघासोबतच स्पर्धेमध्ये विजयी घोडदौड करत असताना. भारतीय महिला हॉकी संघ देखील आशिया अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीला लागला आहे.
गोलरक्षक : सविता, बिचू देवी खरीबम, बन्सरी सोलंकी, माधुरी किंदो.
बचावपटू : निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका, रोपनी कुमारी, महिमा चौधरी, ज्योती छेत्री, प्रीती.
मधली फळी : सलीमा तेटे, मरिना लालरामघाकी, वैष्णवी फाळके, नेहा, ज्योती, एडुला ज्योती, बलजीत कौर, मनीषा चौहान, अक्षता ढेकळे, अजमिना कुजूर
फॉरवर्ड्स : सुनीलिता टोप्पो, मुमताज खान, लालरेमसियामी, संगिता कुमारी, दीपिका, शर्मिला देवी, नवनीत कौर, दीपिका सोरेंग, प्रीती दुबे, वंदना कटारिया, रुतुजा पिसाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.