Women's Asian Hockey Champions Trophy 2024: आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकासाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. बिहार येथे ११ ते २० नोव्हेंबर या कालावधीत प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे. नवनीत कौर हिची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
दक्षिण कोरिया संघाने महिलांची आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा सर्वाधिक तीन वेळा जिंकली आहे. भारत व जपान या दोन देशांनी प्रत्येकी दोन वेळा या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. भारतीय महिला संघाने २०१६ मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर २०२३ मध्ये रांची येथे झालेल्या स्पर्धेतही भारतीय महिलांनी वर्चस्व प्रस्थापित केले. यंदा भारतीय संघ गतविजेता म्हणून हॉकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय महिला हॉकी संघावर दडपण असेल.
भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना मलेशियाविरुद्ध ११ नोव्हेंबरला रंगणार आहे. साखळी फेरीतील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.
गोलरक्षक - सविता, बिच्छू देवी खारीबाम.
बचावपटू - उदिता, ज्योती, वैष्णवी फाळके, सुशीला चानू, इशिका चौधरी.
मधली फळी - नेहा, सलीमा टेटे, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनेलिता टोप्पो, लालरेमसियामी.
आक्रमक फळी - नवनीत कौर, प्रीती दुबे, संगीता कुमारी, दीपिका, ब्युटी डुंगडुंग.
भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड
११ नोव्हेंबर - मलेशिया
१२ नोव्हेंबर - दक्षिण कोरिया
१४ नोव्हेंबर - थायलंड
१६ नोव्हेंबर - चीन
१७ नोव्हेंबर - जपान
कर्णधार सलीमा टेटे भारतीय महिला संघाचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. मागील स्पर्धेत आम्ही यश मिळवले होते. यंदाही जेतेपद राखण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत. अजिंक्यपद पटकावण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.