Hong Kong Open : हाँगकाँगमध्ये अजूनही कोरोना विलगीकरण, सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा रद्द

Hong Kong Badminton Open
Hong Kong Badminton Open esakal
Updated on

Hong Kong Badminton Open : बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) आज स्पष्ट केले की नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धात सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात येत आहे. BWF ने हाँगकाँगमधील सक्तीचे आणि गुंतागुंतीचे विलगीकरण नियम यामुळे ही स्पर्धा रद्द करत असल्याचे सांगितले. (Corona Quarantine Restriction)

Hong Kong Badminton Open
Asia Cup : पाकिस्तानचे टेन्शन वाढलं; हाँगकाँगची घेतली धास्ती

हाँगकाँग सुपर 500 स्पर्धा ही कोवलून येथे 8 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर यादरम्यान खेळवण्यात येणार होती. दरम्यान, 'हाँगकाँग बॅडमिंटन असोसिएशन ही स्थानिक प्रशासनाशी सहभागी खेळाडूंच्या विलगीकरण नियमात सूट मिळावी म्हणून चर्चा करत आहे.' असे वक्तव्य BWF ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

असे असले तरी परदेशी व्यक्तींसाठी सक्तीचे विलगीकर अजूनही आहेच. त्यामुळे हाँगकाँग बॅडमिंटन असोसिएशनने स्पर्धा रद्द करण्याशिवाय कोणता पर्याय नसल्यांचे सांगितले. हाँगकाँग हे असे ठिकाण आहे जिथे बाहेरच्या देशातून प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींचे सक्तीचे विलगीकरण केले जाते. नुकतेच त्यांनी हा विलगीकरणाचा कालावधी 7 दिवसांवरून तीन दिवसांवर आणला आहे.

Hong Kong Badminton Open
Video : कोहलीने केला सलाम, सूर्याने दिली प्रतिक्रिया, "यापूर्वी कधीच पाहिलं नाही"

आशियाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे हाँगकाँग हळूहळू कोरोना महामारीत घातलेले कडक निर्बंध शिथील करत आहे. हाँगकाँग ओपन बरोबरच मकाऊ ओपन सुपर 300 स्पर्धा देखील सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान होणार होती. मकाऊ बॅडमिंटन फेडरेशनने सांगितले की, प्रवास आणि शहरात प्रवेश करण्यावर असलेल्या निर्बंधामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात येत आहे. सध्या BWF World Tour ची जपान ओपन ओसाकामध्ये सुरू आहे. ही स्पर्धा रविवारी संपेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.