Athletics Championships : उत्तेजक चाचणी अधिकाऱ्यांची करडी नजर;राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत खेळाडूंचा कस

हरियाना येथील पंचकुला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंचा कस लागणार आहे. नवी दिल्ली येथून राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेतील (नाडा) ३० पेक्षा जास्त उत्तेजक नमुना चाचणी अधिकारी येथे आले असून त्यांच्याकडून विशिष्ट खेळाडूंची उत्तेजक नमुना चाचणी घेण्यात येणार आहे.
Athletics Championships
Athletics Championshipssakal
Updated on

पंचकुला (हरियाना) : हरियाना येथील पंचकुला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंचा कस लागणार आहे. नवी दिल्ली येथून राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेतील (नाडा) ३० पेक्षा जास्त उत्तेजक नमुना चाचणी अधिकारी येथे आले असून त्यांच्याकडून विशिष्ट खेळाडूंची उत्तेजक नमुना चाचणी घेण्यात येणार आहे.

एका उत्तेजक नमुना चाचणी अधिकाऱ्याकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, पॅरिस ऑलिंपिकआधीची ही ॲथलेटिक्समधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. मोठ्या संख्येने आमचे अधिकारी येथे पोहोचले आहेत. काही विशिष्ट खेळाडूंच्या उत्तेजक चाचण्या घेण्यात येणार आहेत. मी आता अधिक काही सांगू शकत नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी ज्या खेळाडूंच्या लढती पार पडल्या, त्या खेळाडूंच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. तसा करारही करण्यात आला आहे.

‘नाडा’चे अधिकारी स्पर्धा सुरू होण्याआधी एक दिवस अर्थातच बुधवारी येथे दाखल झाले. स्पर्धेच्या काळामध्ये खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्यात आली नाही, पण ‘नाडा’चे अधिकारी दाखल झाल्यानंतर बुधवारी काही खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली असावी.

तेजस्वीन, सर्वेश अंतिम फेरीत

पुरुषांच्या उंच उडी प्रकारात तेजस्वीन शंकर व सर्वेश कुशारे यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तेजस्विन याने पात्रता फेरीत पहिला, तर सर्वेश याने दुसरा क्रमांक पटकावला. दोघांनीही २.१० मीटर उंच उडी मारली.

मनीकांता उपांत्य फेरीत

१०० मीटर राष्ट्रीय विजेत्या मनीकांता होब्लीधर याने पात्रता शर्यत ११.१० सेकंद अशी वेळ देत पूर्ण केली आणि पाचवे स्थान मिळवले. याचसोबत त्याने उपांत्य फेरीतही प्रवेश केला. गुरिंदरवीर सिंग, अमलान बोर्गोहेन व अनिमेश कुजूर यांनीही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. आसामची महिला धावपटू हिमा दास हिने १०० मीटर शर्यत १२.६९ सेकंदांत पूर्ण केली व सहावा क्रमांक पटकावला. हिमा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.