Maharashtra Din : सचिन तेंडुलकर : गल्ली क्रिकेटमधला पोऱ्या कसा बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव ?

सचिनचा भाऊ अजित याने ओळखले की, सचिनमधल्या ऊर्जेला आता दिशा देण्याची वेळ आली आहे. तेव्हापासून त्याचे क्रिकेट प्रशिक्षण सुरू झाले.
sachin tendulkar
sachin tendulkarsakal
Updated on

मुंबई : काही महान जन्माला येतात, काही महानता प्राप्त करतात आणि काहींवर महानता लादली जाते. विल्यम शेक्सपियरने आपल्या 'ट्वेल्थ नाईट' या नाटकात या ओळी लिहिल्या आहेत.

आणखी एका प्रकारचे लोक असतात. ते आपल्या मेहनतीने आपली उंची वाढवतात आणि श्रेष्ठ बनतात. त्यापैकी काही अतिशय खास आहेत. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या श्रेणीत येतो.

अप्रतिम प्रतिभेसह जन्माला आलेला, कठोर परिश्रम करून योग्य संधी प्राप्त करणारा सचिन क्रिकेटचा देव बनला. या खेळातील महान क्रिकेटपटू २४ एप्रिल रोजी आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. (how sachin tendulkar became god of cricket life story of sachin tendulkar sports journey of sachin tendulkar )

संपूर्ण जग त्याला क्रिकेटचा जिवंत देव मानते. सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आणि एक बेंचमार्क सेट केला.

सचिनने हे सगळं कसं साध्य केलं ? तुम्हालाही सचिनप्रमाणे आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण जाणून घेणे आवश्यक आहे. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

sachin tendulkar
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलांचं शिक्षण किती झालंय माहितीये का ?

२४ एप्रिल १९७३ रोजी मराठी कवी, कादंबरीकार आणि साहित्यिक रमेश तेंडुलकर आणि त्यावेळी विमा विभागात काम करणाऱ्या रजनी यांच्या पोटी सचिनचा जन्म झाला. त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर याने त्याची खेळातील प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे नेले, जे सचिनचे गुरू बनले.

साहित्य सहवासमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळत असताना सचिन आणि त्याचा मित्र झाडावर चढले होते. फांदी तुटून दोघेही खाली पडले. यावेळी सचिनचा भाऊ अजित याने ओळखले की, सचिनमधल्या ऊर्जेला आता दिशा देण्याची वेळ आली आहे. तेव्हापासून त्याचे क्रिकेट प्रशिक्षण सुरू झाले.

१९८८ मध्ये जगाला त्याच्या प्रतिभेची झलक मिळाली जेव्हा त्याने आणि विनोद कांबळी यांनी आंतरशालेय सामन्यात ६६४ धावांची नाबाद भागीदारी केली. सचिनने त्या सामन्यात नाबाद ३२५ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात कांबळीने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या. नंतरच्या काळात कांबळीची क्रिकेट कारकीर्द वादग्रस्त ठरली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजारहून अधिक धावा करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटर आहे. २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनने भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये ३४ हजार ३५७ धावा केल्या. त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजार ९२१ धावा आहेत.

सर्वाधिक कसोटी शतके (५१) आणि सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा (२००) विक्रम त्याच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक चौकार (२०५८) आहेत आणि तो सर्वात जलद १५ हजार कसोटी धावा करणारा फलंदाज आहे.

सचिन ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळला आहे. सर्वाधिक एकदिवसीय धावा (१८ हजार ४२६) आणि सर्वाधिक एकदिवसीय शतके (४९) केली आहेत. वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला पुरुष फलंदाज आहे. त्याने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. सहा विश्वचषकांमध्ये खेळलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे.

त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की, त्याने रागाच्या भरात कधीही कोणतीही टिप्पणी केली नाही. एखाद्या खेळाडूने कधी त्याच्याविरुद्ध टिप्पणी केली तरी, त्या टिप्पणीला तो त्याच्या बॅटने प्रत्युत्तर देत असे.

sachin tendulkar
Sachin Tendulkarच्या आलिशान घराचे हे फोटो पाहिलेत का ?

सचिन जेव्हा जेव्हा फलंदाजीला उतरायचा तेव्हा तो मैदानावर येण्यापूर्वी सूर्यदेवाला नतमस्तक व्हायचा. विश्वचषकादरम्यान वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यावर तो घरी आला, वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला आणि पुन्हा क्रिकेट खेळायला परतला.

त्यानंतर सचिन पुढच्या सामन्यात खेळायला आला आणि त्याने शतक ठोकून आपल्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली वाहिली. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा सन्मान प्राप्त होणारा तो पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू आहेत. २००८ मध्ये त्याला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्याने भारतीय क्रिकेटपटूंच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे आणि गेली अनेक वर्षे कोट्यवधी भारतीयांची सर्वात मोठी आशा तो होता. सचिन त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळेच महान क्रिकेटपटू आणि अनेकांसाठी क्रिकेटचा देव बनला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()