HS Prannoy : भारताने तब्बल 41 वर्षांनी एशियन गेम्समध्ये बॅडमिंटन पुरूष एकेरीत भारताला पदकप्राप्ती झाली आहे. भारताचा झुंजार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने हांगझू येथील 19 व्या एशियन गेम्समध्ये कांस्य पदक पटकावले. चीनच्या ली शिफयांगविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात प्रणॉयचा 21 - 16, 21 - 9 गेम्सनी पराभव झाला. मात्र पाठदुखीने त्रस्त असलेल्या प्रणॉयने झुंजार वृत्ती दाखवली.
भारताला एशियन गेम्समध्ये बॅडमिंटन पुरूष एकेरीमध्ये 1982 मध्ये पदक मिळाले होते. एचएस प्रणॉयने 5 ऑक्टोबरला झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात री जी जियाचा 21 - 16, 21- 23, 22 - 20 असा विजय मिळवला होता. 78 मिनिटे चालेल्या या सामन्यात लीने प्रणॉयसमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र प्रणॉयने शेवटच्या दोन गेममध्ये झुंजार खेळ केला. विजयानंतर प्रणॉयने आपला शर्ट काढून जल्लोष केला. कोच पुलेला गोपिचंद यांना देखील मिठी मारली.
एशियन गेम्समध्ये भारताने प्रणॉयच्या रूपाने 88 वे पदक जिंकले. यात 21 सुवर्ण 32 रौप्य आणि 35 कांस्य पदकाचा समावेश आहे. भारतीय महिला आर्चरनी दिवसाची सुरूवात कांस्य पदकाने केली होती. यानंतर भारतीय पुरूष क्रिकेट संघाने देखील अंतिम फेरी गाठत रौप्य पदक निश्चित केले आहे.
कुस्तीमध्ये भारताचा स्टार खेळाडू बजरंग पुनियाला सेमी फायनलमध्ये इराणच्या कुस्तीपटूकडून पराभव सहन करावा लागला. त्यामुळे तो आता कांस्य पदकासाठी खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.