Babar Azam captain Imran Khan : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सुरुवातीला पाकिस्तान उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही असे वाटत होते. पण नंतर पाकिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की त्यांनीच पीसीबीला बाबर आझमला कर्णधार बनवण्याची विनंती केली होती.
पाकिस्तानचा संघ २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्याच फेरीमधून बाहेर पडला होता. त्यानंतर माझ्या सांगण्यावरूनच बाबर आझमची पाकिस्तानच्या कर्णधारपदावर निवड करण्यात आल्याचे देशाचे माजी प्रधानमंत्री आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांनी म्हंटले आहे. इंग्लंडमध्ये २०१९ ला खेळविण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची धुरा सर्फराझ अहमदच्या खांद्यावर होती. मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्याच्या जागी बाबरची निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने बाबर आझमसाठी खूपच निराशाजनक होते, कारण तो मोठी धावसंख्या करू शकला नव्हता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याने सुरेख अर्धशतक झळकावले. पाकिस्तान विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार्या अंतिम सामन्यात तिचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.