व्हीगन हा एक आहाराचा प्रकार आहे, प्राणी, पक्षी आणि त्यांच्यापासून बनलेल्या अथवा उत्पन्न झालेल्या गोष्टी टाळल्या जातात. ज्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध, अंडी यांचा समावेश होतो.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने डाएटसंदर्भातील वादावर (Virat Kohli diet controversy) स्पष्टीकरण दिले आहे. मी विगन असल्याचा कधीही दावा केला नव्हता, असे कोहलीने म्हटलय. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका चाहत्याने कोहलीला डाएट संदर्भात प्रश्न विचारला होता. यावर रिप्लाय देताना कोहलीने 'खूप साऱ्या भाज्या, काही प्रमाणात अंडी, 2 कप कॉफी, पालक पदार्थाचे सेवन करतो, असे सांगितले होते. काही लोक हेल्दी आहाराचे कौतुक करत असताना काहींनी अंडे खाण्याच्या उत्तरावरुन विराटला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीचा एक जुना व्हिडिओ शेअर करुन तो Vegan (व्हीगन हा एक आहाराचा प्रकार आहे, प्राणी, पक्षी आणि त्यांच्यापासून बनलेल्या अथवा उत्पन्न झालेल्या गोष्टी टाळल्या जातात. ज्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध, अंडी यांचा समावेश होतो.) असताना अंडी कसा खाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला होता. (I NBever Claimed To Be Vegan Always Maintained Vegetarian Says Virat Kohli On His Diet)
सोशल मीडियातील चर्चेवरुन वाद वाढत असताना विराट कोहलीने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट करुन हा वाद संपवण्याचा प्रयत्न केलाय. मी कधीही व्हीगन असल्याचा दावा केलेला नाही. व्हेजीटरियन असल्याचे नेहमी सांगत आलो आहे, अशा आशयाचे ट्विट कोहलीने केले आहे. कोहलीने (Virat kohli on Vegan) शनिवारी इंस्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून प्रश्नोत्तराचे सेशन घेतले. यावेळी एका चाहत्याने त्याला डाएटच्याबाबतीत प्रश्न विचारला होता.
कोहलीने नॉनवेज सोडल्याचा किस्सा
2018 मध्ये सेंच्युरियनमधील टेस्टदरम्यान एका मुलाखतीमध्ये कोहली म्हणाला होता की, सर्वायकल स्पाईनचा त्रासामुळे बॅट पकडणे मुश्कील झाले होते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यामुळे मांस खाणे सोडण्याची वेळ आली होती, असे त्याने म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.