माजी ऑस्ट्रेलियन कॅप्टनने रहाणेला केले 'विराट' यशाचा वाटेकरी

Ian Chappell credited capable assistance of vice captain Ajinkya Rahane of Virat Kohli success
Ian Chappell credited capable assistance of vice captain Ajinkya Rahane of Virat Kohli successesakal
Updated on

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये भारताला एका वेगळ्याच उंचीवर नेले. त्यामुळे त्याच्या राजीनाम्यानंतर विराटबद्दल अनेक आजी माजी दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली. यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कॅप्टन इयन चॅपल (Ian Chappell) यांची देखील भर पडली आहे. त्यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाचे (Virat Kohli Test Captaincy) तोंडभरून कौतुक केले आहे. मात्र ते विराटच्या या यशात भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला. (Ian Chappell credited capable assistance of vice captain Ajinkya Rahane of Virat Kohli success)

Ian Chappell credited capable assistance of vice captain Ajinkya Rahane of Virat Kohli success
Video: U19 वर्ल्डकप सामन्यादरम्यान भुकंपाचे हादरे; सपोर्ट स्टाफची पाचावर धारण

इएसपीएन क्रिकइन्फोच्या वेबसाईटवरील लेखात इयन चॅपल म्हणतात, 'विराट कोहली हा भारताचा एक यशस्वी कर्णधार आहे. ज्यावेळी विराट कोहलीने धोनीकडून नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली त्यावळी त्याच्याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. त्याच्या अतीउत्साहाला काही मर्यादाच नव्हती. तो एक चांगला नेता बनू शकेल का असे वाटत होते. मात्र विराट कोहली एक चांगला कर्णधार होता यात शंकाच नव्हती. त्याने त्याचा अतीउत्साहीपणा कधीही दाबून ठेवला नाही. पण, तरीही त्याने भारतीय संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. त्याला यामध्ये तत्कालीन उपकर्णधार अजिंक्य रहाणेची (Former Vice Captain Ajinkya Rahane) योग्य साथ लाभली. त्याने भारताला परदेशात जेवढे यश मिळवून दिले तेवढे इतर कोणत्याही कर्णधाराला जमले नाही.'

Ian Chappell credited capable assistance of vice captain Ajinkya Rahane of Virat Kohli success
Video: BBL विजेतेपदाचे 'रक्ताने माखलेले' सेलिब्रेशन

चॅपल पुढे म्हणाले, 'ऑस्ट्रेलियाचा २०१८-१९ आणि इंग्लंडमधील २०२१ चा दौरा हे त्याचे परदेशातील महत्वाचे दोन विजय आहेत. घरच्या मैदानावर त्याचा संघ कायमच अपराजित भासत होता. कोहलीने सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनीचा (MS Dhoni) वारसा पुढे नेला. त्यावर आपल्या सात वर्षाच्या कॅप्टन्सीच्या कारकिर्दिने कळस चढवला. त्याला कर्णधार म्हणून फक्त दक्षिण आफ्रिकेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारातला १ - ० अशी आघाडीवरून पराभवाचे तोंड पहावे लागले. तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.