India vs Pakistan in men's blind cricket final : भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघाने शुक्रवारी बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा फेडरेशन (IBSA) वर्ल्ड गेम्स 2023 ची अंतिम फेरी गाठली. वर्ल्ड गेम्सच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशला 20 षटकात 144/6 पर्यंत रोखले आणि नंतर 18 चेंडू बाकी असताना 145/3 च्या लक्ष्याचा पाठलाग केला.
शनिवारी अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा दोन्ही संघांनी मोहिमेला सुरुवात केली. तेव्हा पाकिस्तानने भारताचा 18 धावांनी पराभव केला. भारत आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशने पहिल्या नऊ षटकांत 62 धावा केल्यामुळे चांगली सुरुवात झाली. बांगलादेशकडून चांगली फलंदाजी करणारा आशिकुर रहमान 13व्या षटकात धावबाद झाला आणि संघाला 88/3 अशी अवस्था झाली. त्यानंतर एम आरिफ हुसेन आणि एस इस्लाम यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि 56 धावांची भागीदारी केली. भारताने बांगलादेशला 150 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही आणि शेवटच्या षटकात तीन विकेट घेत टायगर्सला 144/6 पर्यंत रोखले.
145 धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीचा धक्का बसला. कारण मेन इन ब्लू संघाने तिसर्याच षटकात फक्त 17 धावा असताना त्यांची पहिली विकेट गमावली. यानंतर सुनील रमेश आणि नरेशभाई बाळूभाई तुमडा यांनी 68 धावांची भागीदारी करत भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. भारताला शेवटच्या 10 षटकांत आणखी 55 धावांची गरज होती. एनबी तुमडा आणि दुर्गा राव टोमपाकी यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि भारताने 17 षटकांत लक्ष्य गाठले.
एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी IBSA वर्ल्ड गेम्सच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
दरम्यान, भारतीय महिला अंध संघही अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून शनिवारी एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेतेपदाचा सामना होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.