भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. इंग्लंडमधील साउथम्प्टन स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची (ICC World Test Championship Final 2021) जोरदार चर्चा सुरू आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन संघांमध्ये हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबत आयसीसीने (ICC) मोठा निर्णय घेतला आहे. जर अंतिम सामना बरोबरीत सुटला किंवा ड्रॉ झाला, तर अशा परिस्थितीत दोन्ही संघांना विजेते म्हणून घोषित केले जाईल, अशी घोषणा आयसीसीने शुक्रवारी केली. (World Test Championship Final playing conditions announced by ICC)
याआधी पाच दिवसांच्या कसोटी सामन्यासाठी एक राखीव दिवसही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जरा काही कारणास्तव खेळाचा वेळ वाया गेला, तर राखीव दिवशी हा वेळ भरून काढला जाईल. तसेच या दिवशी सकाळी लवकर सामना सुरू केल्यानंतर उशिरापर्यंत हा सामना खेळवण्याबाबत तरतूद करण्यात आली होती. जर पाच दिवस सामना खेळून झाल्यानंतरही कोणताच निकाल लागला नाही, तर राखीव दिवसाबाबत कोणताच निर्णय घेतला जाणार नाही, असेही आयसीसीने म्हटले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. इंग्लंडमधील साउथम्प्टन स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. १८ जून ते २२ जून दरम्यान कसोटीचा बॉस कोण? हे ठरणार आहे. भारतीय संघ सध्या मुंबईत क्वॉरंटाइनमध्ये आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. तर न्यूझीलंडचा संघ याआधीच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे.
न्यूझीलंडला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. हे सामने खेळताना न्यूझीलंडचा संघ तेथील वातावरणाशी सुसंगत होण्याचा प्रयत्न करील. त्याचा त्यांना अंतिम सामन्यासाठी फायदा होईल, यात शंका नाही. दुसरीकडे भारतीय संघही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल.
क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.