टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघ; ICC नं घेतले महत्त्वाचे निर्णय

ICC
ICC
Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) 2024 ते 2031 या आठ वर्षाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आयसीसीनं अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषकातील संघांची संख्या वाढवण्याचा महत्वाचा निर्णयही घेतला आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीही नवीन पद्धतीनं खेळवण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीनं पुढील आठ वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. (ICC announces expansion of global events)

टी-20 विश्वचषक प्रत्येक दोन वर्षांनी खेळळवण्यात येणार आहे. तसेच टी-20 विश्वचषकातील संघाची संख्याही आता 20 करण्यात आली आहे. 2024, 2026, 2028 आणि 2030 या कालावधीत टी-20 विश्वचषक होणार आहे. 50 षटकांच्या विश्वचषकात 2027 आणि 2031 मध्ये 14 संघाचा सहभाग असेल. सध्या एकदिवसीय विश्वचषक 10 संघासोबत खेळवला जातो. यासोबच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे चार हंगाम आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील फेरीत खेळवल्या जातील, अशी माहितीही आयसीसीच्या वतीनं देण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आठ संघामध्ये खेळवली जाणार असून 2025 आणि 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

ICC
WTC Final : तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

एकदिवसीय विश्वचषकात 14 संघाचा सहभाग असणार आहे. दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी 7 -7 संघाचा समावेश असेल. दोन्ही ग्रुपमधील अव्वल तीन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल असा कार्यक्रम होईल. 2003 विश्वचषकात या फॉर्मेटचा वापर केला होता. टी-20 विश्वचषक आता दरदोन वर्षांनी होणार आहे. यामध्ये 20 संघाचा सहभाग असेल. या संघाचा चार ग्रुपमध्ये विभागलं जाईल. प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन उपंत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर उपांत्य फेरीत चार संघ पोहचतील. याआधीप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

ICC
WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

पुरुष, महिला आणि अंडर -19 स्पर्धेच्या पुढील यजमानपद निश्चित करण्याच्या प्रक्रिया स्पटेंबरमध्ये ठरेल. पुरुषांच्या स्पर्धेचं आयोजन कोण करणार याची निवड सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे. महिलांच्या स्पर्धा आणि अंडर-19 स्पर्देच्या यजमानपदाबाबतचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.