ICCचा वर्ल्डकप सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व तात्काळ प्रभावनं निलंबित केलं आहे. श्रीलंकन सरकारचा बोर्डामध्ये हस्तक्षेप वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (ICC Board has suspended Sri Lanka Cricket membership of the ICC with immediate effect)
आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली या बैठकीत श्रीलंकेच्या बोर्डावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं आयसीसीचा एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केलं असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. (Latest Sport News)
विशेषत: या श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या व्यवहारांचं स्वायत्तपणे व्यवस्थापन होणं अपेक्षित असताना बोर्डाच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप तर होत नाहीए ना? याची खात्री करणं आवश्यक असल्याचं आयसीसीनं म्हटलं. तसेच श्रीलंकेत क्रिकेट बोर्डाच्या निलंबनाच्या कारवाईवर आयसीसी बोर्ड योग्य वेळी निर्णय घेईल, असंही आयसीसीनं म्हटलं आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.