आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलचे संचालक ग्रेग बार्कले (ICC Chairmen Greg Barclay) यांनी टी20 क्रिकेटबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. देशांतर्गत वाढत्या टी 20 लीगमुळे (Domestic T20 League) येणाऱ्या दशकात द्विपक्षीय आणि कसोटी सामन्यांची (Test Cricket) संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. बार्कले यांनी आयसीसीला फ्युचर टूर प्रोग्राम तयार करण्यास देखील खूप अडचणी येणार असल्याचे सांगितले.
बार्कले यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी बीबीसीला मुलाखत दिली. टेस्ट मॅच स्पेशल या कार्यक्रमात ते म्हणाले की, 'प्रत्येक वर्षी महिला आणि पुरूषांची एक स्पर्धा होते. याचबरोबर देशांतर्गत लीग स्पर्धा वाढत आहेत. यामुळे द्विपक्षीय मालिका छोट्या होत आहेत. याचा विपरित परिणाम होणार आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोण देखील बदलेल आणि ज्या देशांना भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यासारखे देशांविरूद्ध खेळण्याची संधी मिळत नाही त्यांच्या तिजोरीवर देखील परिणाम होईल. येणाऱ्या 10 ते 15 वर्षात कसोटी क्रिकेट खेळाचा एक अविभाज्य घटक तर असेल मात्र सामन्यांची संख्या मात्र कमी झालेली असेल.'
आयसीसी संचालकांनी या सर्वाचा भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यावर फारसा फरक पडणार नाही असेही सांगितले. कार्कले यांनी महिला क्रिकेटमधील टेस्ट फॉरमॅट वेगाने प्रगती करत नाहये असेही सांगितले. ते म्हणाले की, 'कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांची रचना तशी असावी लागते. अशी रचना कोणत्याही देशात नाहीये. मला नाही वाटत की महिला क्रिकेटमध्ये टेस्ट फॉरमॅटचा चांगल्या गतीने विकास होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.