आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC Cricket Board) महत्त्वपूर्ण बैठक दुबईत पार पडणार आहे. दुबईत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात (T20 World cup) चर्चा होऊ शकते. यापूर्वीच बीसीसीआयची विशेष बैठक पार पडली होती. वर्ल्ड कपसंदर्भात आणखी काही अवधी वाढवून मिळावा, अशी विनंती बीसीसीआयने आयसीसीकडे केली होती. यावर आयसीसी काय निर्णय घेणार हे मंगळवारी होणाऱ्या बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा देखील सहभागी होतील, असे बोलले जाते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 4 मे रोजी आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा 29 सामन्यानंतर स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. उर्वरित सामने UAE मध्ये खेळवण्याचा निर्णयही घेणअयात आला आहे. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये युएईच्या मैदानात उर्वरित सामने खेळवण्याचा प्लॅन बीसीसीआयकडून आखण्यात आलाय. बीसीसीआये अधिकृतरित्या युएई हा वर्ल्डकपसाठी दुसरा पर्याय असेल, असेही म्हटले आहे. प्राथमिकता देशात स्पर्धे घेण्यालाच असेल, असेही बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले होते. आयसीसीच्या दुबईतील बैठकीत खालील पाच मुद्यांवर प्राधान्याने विचार विनिमय होईल.
1- टी20 वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या ठिकाणी करायचे?
आयपीएल स्पर्धा स्थगित झाली असली तरी आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतातच व्हावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. परंतु देशात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. दिवसागणिक जवळपास 1.50 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना देशात नोव्हेबरच्या दरम्यान कोरोनाची तिसरी लाट उसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आयसीसी यासंदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण असेल.
2 यजमानपदाचे अधिकार कोणाकडे?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतात नियोजित टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युईमध्ये किंवा अन्य ठिकाणी घेण्याचा निर्णय झाला तर यजमानपद कोण भुषविणार हा देखील मोठा प्रश्नच आहे. जर यजमानपद भारताकडे राहिले आणि स्पर्धा युएईत झाली तर UAE क्रिकेट बोर्डाला मोठा फायदा होईल. त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. क्रिकइन्फोच्या एका वृत्तानुसार, यजमान देशाला प्रत्येक मॅचसाठी जवळपास 2 कोटी इतकी रक्कम मिळते. टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 सामने नियोजित आहेत. त्यानुसार UAE क्रिकेट बोर्डाला 90 कोटी मिळतील. त्यामुळे यजमान पदाचा अधिकार कोणाकडे राहणार या प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
3- टॅक्स सवलतीचा मोठा प्रश्न
बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात वर्ल्ड कपच्या आयोजनासंदर्भात कर सवलतीच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. 2016 च्या वर्ल्डकपवेळी कर सवलत न मिळाल्याने आयसीसीने बीसीसीआयचे 200 कोटी रुपये थकवले आहेत. यासंदर्भात बीसीसीआयने आईसीसीच्या वादविवाद सोडवणाऱ्या लवादाकडे तक्रारही केली आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, चेन्नई, लखनऊ, धर्मशाला, हैदराबाद आणि अहमदाबाद या नऊ ठिकाणांचा समावेश आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी वर्ल्ड कप भारतात होणार असल्यास कर सवलतीवरुन पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो. बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्यात कर सवलतीवर कोणतीही सकारात्मक चर्चा झालेली नाही. जर केंद्र सरकारकडून करात 10 टक्के सवलत देण्यात आली तर बीसीसीआयला जवळपास 226 कोटी रुपय द्यावे लागतील. याउलट सवलत मिळाली नाही तर 906 कोटी रुपये द्यावे लागतील. बीसीसीआय सुरुवातीपासून टॅक्स सवलतीशिवाय स्पर्धा भरवण्यावर जोर देत आहे.
4- पाकिस्तानचा संघ भारतात येणार?
जर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात झाली तर पाकिस्तानी संघ खेळणार का? या प्रश्नावरही चर्चा होऊ शकतो. 2012-13 पासून दोन्ही देशात (IND VS PAK) यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून 2016 मधील टी-20 वर्ल्ड कपप्रमाणे यावेळीही पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी मिळेल. पाकिस्तान बोर्डाच्या आणखी काही मागण्या असतील त्यावरही या बैठकीत चर्चा निश्चितच होईल. यात प्रेक्षकांसह मीडियातील लोकांच्या व्हिसासंदर्भातील पाकिस्तानच्या मागणीचा समावेश असू शकतो.
5- वर्ल्ड कपमध्ये 14 टीम ला मिळेल संधी?
आयसीसीच्या बैठकीत यंदाच्या टी-वर्ल्डकपमध्ये 14 टीमला परवानगी दिली जाऊ शकतो. याशिवाय 2023-31 दरम्यानच्या वेळापत्रकावरही चर्चा अपेक्षित आहे. आयसीसी प्रत्येक वर्षी एक स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे. पण भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड याचा याला विरोध आहे. आयसीसीच्या प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेमुळे द्विपक्षीय मालिकेवर परिणाम होईल, असा युक्तीवाद विरोध करणाऱ्या क्रिकेट बोर्डकडून करण्यात येत आहे. यावर मतभेद कायम राहणार की काही तोडगा निघणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.