ICC T20 World Cup 2024 : अमेरिकेत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक; पुढील वर्षी ४ ते ३० जूनदरम्यान विंडीजसह संयुक्तपणे होणार स्पर्धा

अमेरिकेत प्रथमच विश्वककरंडक स्पर्धेचे सामने होतील.
ICC T20 World Cup 2024
ICC T20 World Cup 2024Sakal
Updated on

दुबई : भारतात येत्या काही महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे; पण पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणाऱ्या ट्वेन्टी-२० स्पर्धेचा कालावधी निश्चित झाला. ४ ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा १० विविध ठिकाणी होणार आहे.

ज्या ठिकाणी सामने नियोजित आहेत तेथे आयसीसीच्या टीमने पाहणी केली आणि या ठिकाणांची शॉर्टलिस्ट केले. अमेरिकेत प्रथमच विश्वककरंडक स्पर्धेचे सामने होतील. अमेरिकेतील लौडेनहिल, प्लोरिया या शहरांत सामने होतील. येथे अगोदरच आंतरराष्ट्रीय सामने झालेले आहेत आणि आता येत्या काही दिवसांत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतीलही काही सामने येथे होणार आहेत.

विश्वकरंडक स्पर्धेतील काही सामने मॉरिसविल, डल्लास आणि न्यूयॉर्क येथेही होणार आहेत. मॉरिसविल आणि डल्लास येथे सध्या अमेरिकेच्या मेजल लीग क्रिकेट स्पर्धेचे सामने होत आहे. ग्रँड प्रॅईरी स्टेडियम (डल्लास), चर्च स्ट्री पार्क (मॉरिसविल) आणि वॅन कोर्टलँड पार्क (न्यू यॉर्क) यांना अजून आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा दर्जा मिळालेला नाही.

विश्वकरंडक स्पर्धेचे सामने व्हायचे असतील, तर त्यांना हा दर्जा मिळणे आवश्यक आहे. आयसीसी, वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि अमेरिका क्रिकेट मंडळ येत्या काही दिवसांत ही स्टेडियम आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रूपांतरित करतील, असे सांगण्यात येत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी स्कॉटलंड आणि पापू न्यू गयाना या नुकत्याच पात्र ठरलेल्या संघासह एकूण १२ संघ पात्र ठरले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.

फॉरमॅट बदलणार

गेल्या दोन (२०२०-२१ आणि २०२२) स्पर्धांच्या तुलनेत पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेचा फॉरमॅट वेगळा असणार आहे. स्पर्धेत एकूण २० संघ असतील आणि त्यांची चार गटात विभागणी असेल. प्रत्येक गटात पाच संघ असतील.

गटातील पहिले दोन संघ सुपर-८ साठी पात्र ठरतील. या आठ संघांची दोन गटात विभागणी असेल आणि या दोन गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २०२४-२०३१ या पुढील आठ वर्षांच्या मालिकेतील ही पहिली विश्वकरंडक स्पर्धा असेल. २०२१ मध्येच स्पर्धेचा हा ढाचा निश्चित करण्यात आला होता. अमेरिकेतही क्रिकेटचा प्रसार करण्याच्या हेतूने २०२४ मधील या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे संयुक्त यजमानपद अमेरिकेला देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.