आयसीसी पुरूष कसोटी संघ २०२१ ची (ICC Men Test Team of 2021) घोषणा झाली असून या संघाचे नेतृत्व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे सोपवण्यात आले आहे. या संघात दोन आशियाई संघांनी चांगलाच दबबा निर्माण केलाय. या संघात भारताचे (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) प्रत्येकी ३ खेळाडू समाविष्ट आहेत. मात्र या संघात भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) जागा मिळालेली नाही.
आयसीसी पुरूष कसोटी संघात तीन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma), विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) यांचा समावेशी आहे. फलंदाजीत मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयशी होणाऱ्या विराट कोहलीला या संघात स्थान मिळालेले नाही. (ICC Men Test Team of 2021Rohit Sharma Included Virat Kohli Not Included)
या संघात फवाद आलम, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी या तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. याचबरोबर न्यूझीलंडच्या केन विलियमसन व्यतिरिक्त कायल जेमिसनही या संघात समाविष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.