ICC CWC Point Table : बांगलादेश टॉपर; टीम इंडिया तळाला

BAN VS IND
BAN VS INDFILE PHOTO
Updated on

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या पॉइंट टेबलमध्ये ((ICC Men's Cricket World Cup Super League) मोठा फेरबदल झालाय. श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचा बांगलादेशला फायदा झाला असून त्यांनी थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. 2023 मध्ये भारतीय मैदानात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पात्रता सिद्ध करण्याचा बांगलादेशचा प्रवास सुकर झाल्याची चिन्हे नव्या पाँइट टेबलवरुन दिसून येते. वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये बांगलादेशने आतापर्यंत 9 सामने खेळले असून यातील 5 विजयासह त्यांच्या खात्यात 50 गुण जमा झाले आहेत. (ICC-Mens-Cricket-World-Cup-Super-League-Points-Table)

गत विश्वविजेता इंग्लंडचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. पाकिस्तान संघाने 6 पैकी 4 सामन्यातील विजयासह 40 गुण मिळवले असून ते या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही पाकिस्तान ऐवढेच 40 गुण आहेत. परंतु 'लो नेट रनरेट'मुळे ते चौथ्या स्थानावर आहेत.

BAN VS IND
डिप्रेशनचा सामना करणाऱ्या नाओमीची आयोजकांनी मागितली माफी

न्यूझीलंड, अफगानिस्तान, वेस्टइंडीज प्रत्येकी 30-30 गुणांसह पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने (Indian Cricket Team) ने वनडे सुपरलीगमधील 6 सामन्यातील 3 सामने गमावले असून 29 गुणांसह त्यांचा या क्रमवारीत आठवा क्रमांक लागतो. टीम इंडियाचे रनरेट ही निराशजनक आहे.

BAN VS IND
शफालीच्या प्रक्टिसचा विषयच हार्ड! 150 बाऊन्सर अन् ...

भारतीय संघ गुणतालिकेत तळाला असला तरी याचा त्यांना कोणताही फटका बसणार नाही. याचे 2023 चा वर्ल्ड कप हा भारतात रंगणार आहे. यजमानपद असल्यामुळे भारतीय संघाला थेट एन्ट्री मिळेल. आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये पात्र ठरण्यासाठी वर्ल्ड कप सुपर लीग पाँइट टेबलमधील चुरस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे संघ गुणतालिकेत पहिल्या आठमध्ये असतील ते वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.