ICC awards 2023 : क्रिकेटर ऑफ द इयरच्या रेसमध्ये दोन भारतीय मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंचेही तगडे आव्हान

ICC awards 2023
ICC awards 2023esakal
Updated on

ICC Cricketer of the Year 2023 : आयसीसीने नुकतेच पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर 2023 पुरस्कारासाठी रेसमध्ये असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत दोन भारतीय आणि दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांना नामांकन मिळालं असून ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेडचे देखील या यादीत नाव आहे.

ICC awards 2023
SA vs IND : कौशल्य कमी नशीब जास्त... 55 धावात खुर्दा उडाला तरी आफ्रिकेच्या प्रशिक्षकांची कॉलर ताठ

विराट कोहली

2022 च्या उत्तरार्धात विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत आला. त्यानंतर विराट कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये खोऱ्याने धावा काढत आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक 765 धावा केल्या आहेत. विराटने आठ कसोटीत ५५.९१ च्या सरासरीने ६७१ धावा केल्या.


रवींद्र जडेजा

जडेजाने यावर्षी 35 सामन्यांमध्ये 613 धावा आणि 66 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजासाठी हे वर्ष रेड बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त होते. त्याने बॅटनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील अविचल 70 धावांचा समावेश आहे.

ICC awards 2023
Ranji Trophy 2024 : बिहारचा सचिन! अवघ्या 14 व्या वर्षी रणजी पदार्पण, मात्र वय सापडलं वादाच्या भोवऱ्यात

पॅट कमिन्स

पॅट कमिन्ससाठी २०२३ हे वर्ष स्वप्नवत ठरले. कसोटी मैदानात कमिन्सने खेळाडू म्हणून आपले अष्टपैलू कौशल्य दाखवून दिले. पहिल्या अॅशेस कसोटीदरम्यान, त्याने सुरुवातीच्या डावात एकही विकेट घेतली नाही, परंतु त्याने 38 धावा करून इंग्लिश संघाची आघाडी केवळ 10 धावांपर्यंत आणली होती.

ट्रॅव्हिस हेड


ट्रॅव्हिस हेड एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा हिरो होता. संथ विकेटवर 120 चेंडूत त्याची 137 धावांची खेळी ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयासाठी महत्त्वाची होती, ही त्यांची एकूण सहावी खेळी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.