ICC Men's Player Rankings : आयसीसी टी 20 प्लेअर रँकिंगमधील पहिले स्थान पटकावण्याची स्पर्धा अजूनच तीव्र झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिका तसेच पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील देखील मालिका नुकतीच संपली. या मालिकेनंतर भारताच्या सूर्यकुमार यादव आणि टी 20 बॅट्समन रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मोहम्मद रिझवान याच्यांतील रेटिंगमधील अंतर आता फक्त 16 इतकंच राहिलं आहे. सूर्यकुमार यादव रिझवानचे तख्त हिसकावून घेण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे.
सूर्यकुमार यादवने नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतकांसह 119 धावा केल्या आहेत. तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याचबरोबर त्याने 838 रेटिंग मिळवत आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये दुसरे स्थान मिळवले. तो मोहम्मद रिझवानच्या (854) फक्त 16 पॉईंट मागे आहे. सूर्यकुमार यादव आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये रिझवानचे अव्वल स्थान हिसकावून घेऊ शकतो.
मोहम्मद रिझवानने इंग्लंडविरूद्धच्या सात टी 20 सामन्यांच्या मालिकेत 316 धावा केल्या. तो देखील मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रिझवानला सहाव्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याला सातव्या सामन्यात फक्त 1 धाव करता आली होती. याचा फायदा सूर्यकुमार यादवला उचलता आला असता. त्याला रिझवानला पहिल्या स्थानावरून खाली खेचता आले असते. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात फक्त 8 धावाच करता आल्या.
याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानच्या या दोन फलंदाजांची टी 20 रँकिंगमधील रस्सीखेच टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडणार आहे. याच सामन्याने ते आपल्या वर्ल्डकप अभियानाची सुरूवात करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.