Video : T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हॅटट्रिक हुकली!

अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुस्तफिझुर हॅटट्रिकवर होता. पण...
Bangladesh vs Scotland
Bangladesh vs ScotlandSakal
Updated on

ICC Mens T20 World Cup 2021 : स्पर्धेतील पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामना बांगलादेश (Bangladesh) आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यात खेळवण्यात आला. बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्काटलंडच्या क्रिस ग्रेव्जने Chris Greaves 28 चेंडूत केलेल्या 45 धावा आणि मार्क वॅटने त्याला दिलेली उत्तम साथ 22 (17) याच्या जोरावर स्कॉटलंडने निर्धारित 20 षटकात 9 बाद 140 धावा केल्या.

स्कॉटलंडच्या संघाने अखेरच्या तीन षटकात तीन विकेट गमावल्या. यात अखेरच्या षटकात मुस्तफिझुरने घेतलेल्या दोन विकेटचा समावेश होता. स्कॉटलंडकडून दमदार खेळी करणाऱ्या क्रिसला मुस्तफिझुरने शाकिब करवी झेलबाद केले. अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने 45 धावांवर विकेट फेकली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या जोश डेव्हीला मुस्तफिझुरने खातेही उघडू दिले नाही. एका अप्रतिम यॉर्करवर त्याच्या दांड्या उडल्या. स्कॉटलंडच्या डावातील अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुस्तफिझुर हॅटट्रिकवर होता. व्हेलनं त्याच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली अन् त्याची हॅटट्रिकची संधी हुकली.

Bangladesh vs Scotland
Ban Pak Cricket ट्रेंडचा भारत-पाक लढतीवर परिणाम होईल?

पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेव हॅटट्रिकची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीनं बांगलादेश विरुद्ध हा पराक्रम करुन दाखवला होता. त्याने शाकिब अल हसन, मोर्तुझा आणि अलोक कपाली या तिघांना बाद करत टी-20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक नोंदवली होती. ही आतापर्यंतची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील एकमेव हॅटट्रिक आहे. बांगलादेशच्या मुस्तफिझुरकडे ही संधी होती. पण त्याला या संधीच सोन करण्यात अपयश आले.

Bangladesh vs Scotland
मलिंगाचा विक्रम मोडला; शाकिब टी-20 चा नवा बादशहा!

आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हॅटट्रिकचा विचार केल्यास आतापर्यंत 19 हॅटट्रिक पाहायला मिळाल्या आहेत. यात दोन वेळा मलिंगाने केलेल्या हॅटट्रिकचा समावेश आहे. टी-20 मध्ये दोनवेळा हॅटट्रिक करण्याचा विक्रम हा मलिंगाच्या नावे आहे. भारताच्या दीपक चाहरचाही या यादीत समावेश आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.