संघाला शून्यातून सावरलं; टी-20 वर्ल्ड कपमधील पहिली फिफ्टी!

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
Assad Vala
Assad Vala ICC
Updated on

ICC Mens T20 World Cup 2021 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ओमनच्या मैदानात पापुआ न्यू गिनी आणि ओमान हे ग्रुप बी मधील दोन संघ पहिल्या लढतीत एकमेकांसमोर आहेत. ओमानने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पापुआ न्यू गिनी संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या आणि दुसऱ्या षटकात त्यांनी लागपोठ दोन विकेट्स गमावल्या. सलामीवीर टोनी उरा 5 चेंडू खेळून खातेही न उघडता परतला. बिलाल खान याने त्याला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खलीमुल्लाह याने लेगा सैकाला खातेही न उघडू देता माघारी धाडले.

Assad Vala
पीसीबीने सुधारली ना‘पाक’ कृती; अखेर जर्सीवर टाकले भारताचे नाव

एकही धाव नसताना दोन विकेट गमावल्यामुळे पापुआ न्यू गिनी संघ बॅकफूटवर होता. पण कर्णधार असद वला याने दबावात अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने चार्ल्स अमीनी याच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. वलाने षटकार खेचून दिमाखात अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर तो माघारी फिरला. त्याने 43 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 56 धावांची खेळी केली.

सुपर-12 राउंडमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी 8 संघ क्वॉलिफायर राउंडमध्ये भिडणार आहेत. ग्रुप ए गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबीया आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे. त ब गटात बांगलादेश, ओमान, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या दोन गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.