ICC New Rules:आयसीसीकडून नवे नियम जाहीर ! ६० सेकंदात टाकावं लागणार दुसरं षटक, नाहीतर 'इतक्या' धावांचा दंड

भारतामध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे यशस्वी आयोजन करण्यात आल्यानंतर आयसीसीची महत्त्वाची बैठक अहमदाबादमध्ये पार पडली.
ICC New Rules:आयसीसीकडून नवे नियम जाहीर ! ६० सेकंदात टाकावं लागणार दुसरं षटक, नाहीतर 'इतक्या' धावांचा दंड
Updated on

ICC New Rules on Bowling: भारतामध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे यशस्वी आयोजन करण्यात आल्यानंतर आयसीसीची महत्त्वाची बैठक अहमदाबादमध्ये पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नवा नियम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार आता एक षटक संपल्यानंतर दुसरे षटक ६० सेंकदांच्या आत सुरू होणे अनिवार्य असणार आहे.

एका डावात तीन वेळा ६० सेंकदांची मर्यादा ओलांडल्यास क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड सुनावण्यात येणार आहे. टी-२० व एकदिवसीय अशा दोन क्रिकेट प्रकारांसाठी या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे.

आयसीसीकडून मंगळवारी याबाबत माहिती देण्यात आली. आधीचे षटक संपल्यानंतर गोलंदाज ६० सेंकदांच्या आत पुढील षटकासाठी तयार झाला नाही, तर दंड लावण्यात येणार आहे. एका डावात तीन वेळा अशी घटना घडली, तर पाच धावांच्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, याआधी विश्‍वकरंडकात टाईम आऊट या नियमामुळे श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज बाद ठरवण्यात आला होता. पहिल्यांदाच असे घडले होते.

डिसेंबर ते एप्रिलचा कालावधी

आयसीसीकडून नवा नियम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. २०२३मधील डिसेंबर महिन्यात या नव्या नियमाचा श्रीगणेशा होणार असून २०२४ मधील एप्रिलपर्यंत हा नियम कायम राहणार आहे. या नियमात कशा प्रकारे खेळ खेळला जात आहे, याची चाचपणी आयसीसीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर हा नियम कायम ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

ICC New Rules:आयसीसीकडून नवे नियम जाहीर ! ६० सेकंदात टाकावं लागणार दुसरं षटक, नाहीतर 'इतक्या' धावांचा दंड
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

डिमेरीटची संख्या आता पाचवरून सहावर

खेळपट्टी व आऊटफिल्ड (आजूबाजूचे मैदान) यांच्यासाठी नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. खेळपट्टी खराब असल्याच्या कारणावरून स्थळांकडून आंतरराष्ट्रीय दर्जा काढून टाकण्यात येतो. पाच वर्षांमध्ये पाच डिमेरीट गुण मिळाले की आंतरराष्ट्रीय दर्जा काढला जातो. आता डिमेरीट गुणांची संख्या सहा करण्यात आली आहे.

ICC New Rules:आयसीसीकडून नवे नियम जाहीर ! ६० सेकंदात टाकावं लागणार दुसरं षटक, नाहीतर 'इतक्या' धावांचा दंड
मोठा निर्णय! अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला आता २ लाखांची मदत; गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.