ICC ODI Ranking : विराटची रँकिंगमध्ये उसळी, स्मिथला टाकलं मागं; रोहितही फायद्यात

ICC ODI Ranking Virat Kohli Rohit Sharma
ICC ODI Ranking Virat Kohli Rohit Sharma esakal
Updated on

ICC ODI Ranking Virat Kohli : भारताने श्रीलंकेचा पहिल्या वनडेत 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने 67 चेंडूत 83 धावांची तर विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे दोघांनाही ICC ODI Ranking मध्ये चांगला फायदा झाली असून दोघांनी रँकिंगमध्ये उसळी घेतली आहे. विराट कोहलीने तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे.

ICC ODI Ranking Virat Kohli Rohit Sharma
Asia Cup 2023: पाकिस्तानने टेकले गुडघे! जय शहांच्या भेटीसाठी सेठी लावत आहेत जुगाड

विराट कोहलीने सलग दुसरे शतक ठोकत भारताच्या विजयात मोठी भुमिका बजावली. रोहित शर्माने देखील आक्रमक 83 धावा ठोकत भारताच्या 373 धावांचा डोंगराचा पाया रचला होता. या दोघांनाही या खेळीचा चांगला फायदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये झाला आहे. विराट कोहली आठव्या स्थानावरून दोन स्थान उसळी घेत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे 726 गुण झाले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथला देखील मागे टाकले आहे. स्मिथ आता 719 गुण घेत सातव्या स्थानावर विराजमान आहे.

तिकडे कर्णधार रोहित शर्माने देखील आपल्या वनडे रँकिंगमध्ये सुधारणा केली असून नवव्या स्थानावर विराट आधी ज्या स्थानावर होता त्या आठव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे 715 गुण झाले आहेत. याचाच अर्थ रोहितही ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला पिछाडण्याच्या तयारीत आहे. या दोघांच्या गुणांमध्ये फक्त चार गुणांचे अंतर आहे.

ICC ODI Bowling Ranking

भारतीय वनडे संघातील गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात दमदार गोलंदाजी करत 2 फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीनंतर सिराजला वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये फायदा त्याचा फायदा झाला. तो रँकिंगमध्ये चार स्थानांची उसळी घेत 18 व्या स्थानावर पोहचला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.