ICC Men's Team ODI Rankings: सुपर-4 सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! ICC केली मोठी घोषणा, काही दिवसांत भंगले स्वप्न

pakistan icc ranking odi
pakistan icc ranking odi
Updated on

ICC Latest Men's Team ODI Rankings :आशिया कप-2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ 10 सप्टेंबरला भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. सर्वांची नजर या सामन्याकडे लागली आहे. यादरम्यान बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला आयसीसी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे.

ICC ODI रँकिंगमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा अव्वल स्थान गमावले आहे. ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर 1 संघ बनला आहे. ब्लूमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 123 धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा वर्चस्व मिळवले.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे आता 121 गुण झाले आहेत, तर दुसऱ्या स्थानावर घसरलेल्या पाकिस्तान संघाचे 120 गुण आहेत. टीम इंडिया 114 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

pakistan icc ranking odi
US Open 2023: रोहन बोपण्णाचा विश्वविक्रम, वयाच्या 43 वर्षी रचला इतिहास... US Open जिंकण्यापासून एक पाऊल दूर

अवघ्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेटमधला नंबर-1 संघ बनला होता. पण काही दिवसांतच खाली आला आहे. मात्र तरीही पाकिस्तानला परत वनडेत एक नंबर बनायची संधी आहे. 10 सप्टेंबरला पाकिस्तानला आशिया कपमध्ये एक सामना खेळायचा आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने भारताचा पराभव केला तर तो पुन्हा एकदा वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.

pakistan icc ranking odi
Ind vs Pak : 10 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, रोहित 'या' 2 खेळाडूंचा पत्ता करणार कट?

दरम्यान, सुपर-4 फेरीत पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानने बांगलादेशचा डाव 38.4 षटकांत 193 धावांत आटोपला. यानंतर 39.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. 6 षटकात केवळ 19 धावा देत 4 बळी घेणाऱ्या हारिस रौफला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.