Newlands Cape Town Pitch SA vs IND 2nd Test : आयसीसीने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केप टाऊनमधील न्यूलँड्समध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत. आयसीसीने या खेळपट्टीला असमाधानकारक असा शेरा दिला आहे. या सामन्यात पहिल्या दिवशीच 23 विकेट्स पडल्या होत्या. तर संपूर्ण कसोटी सामना दीड दिवसात संपुष्टात आला होता.
भारताने केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केप टाऊन कसोटी जिंकणारा भारतीय संघ हा इतिहातील पहिला आशिया संघ ठरला.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा उडवला होता. मोहम्मद शमीने 15 धावात 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 153 धावा करत 92 धावांची आघाडी घेतली.
यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने थोडीफार झुंज दाखवत 176 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 79 धावांचे आव्हान आले होते. हे आव्हान भारताने तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 642 चेंडूत संपला. हा इतिहासातील सर्वात कमी चेंडूत संपलेला कसोटी सामना ठरला.
आयसीसीचे मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी आपल्या अहवालात म्हटले की, 'न्यूलँड्सची खेळपट्टी फलंदाजी करण्यास अवघड होती. चेंडू असमान उसळी घेत होता. हे संपूर्ण सामन्यात होत होतं. त्यामुळे फटके खेळणं अवघड जात होतं. काही फलंदाजांच्या ग्लोव्ह्जला देखील चेंडू आदखला. काही विकेट्स या चेंडू अचानक उसळी घेतल्यामुळे पडल्या.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.