वेळ वाचण्यासाठी ICC ने उचलले मोठे पाऊल! आजपासून नव्या नियमाला सुरुवात

ICC Stop-clock trial rule begins with T20I series between West Indies and England
ICC Stop-clock trial rule begins with T20I series between West Indies and England sakal
Updated on

एकदिवसीय व टी-२० या दोन प्रकारांमध्ये वेळ वाया जाऊ नये. वेगवान खेळ व्हावा, यासाठी आयसीसीकडून पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार दोन षटकांमध्ये फक्त ६० सेकंदांचाच अवधी देण्यात आला आहे.

ICC Stop-clock trial rule begins with T20I series between West Indies and England
Vijay Hazare Trophy : मुंबईचा खेळ खल्लास! तमिळनाडूची थाटात उपांत्य फेरीत एन्ट्री

एक षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंद पूर्ण होण्याआधी दुसरे षटक टाकायला तयार राहायला हवे असा नियम तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यामधील पहिल्या टी-२० लढतीने नव्या नियमाला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.२० वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

एकदिवसीय व टी-२० या दोन्ही प्रकारांत खेळाडूंकडून षटकांची गती राखली जात नाही. तसेच काही वेळा मैदानात विनाकारण वेळ वाया घालवला जातो. याची आयसीसीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. अशा घटनांना आळा बसवण्यासाठी आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. गोलंदाजांकडून ६० सेकंदांचा अवधी तीन वेळा ओलांडल्यास त्यांना पाच धावांना मुकावे लागणार आहे. अर्थातच त्यांना पाच धावांची पेनल्टी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.