ICC T20I Ranking Suryakumar Yadav : भारताचा मधल्या फळीतील फलंदाजी सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 46 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सूर्यकुमार यादवला अर्धशतक जरी ठोकता आले नसले तरी या खेळीमुळे त्याच्या टी 20 रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. त्याने आयसीसी टी 20 फलंदाजी रँकिंगमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले.
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टी 20 फलंदाजी रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादवने तिसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. त्याने 780 रेटिंग मिळवत बाबर आझमला खाली खेचले. बाबर आझमचे रेटिंग 771 इतके आहे. आता सूर्यकुमार यादवच्या रडावर दक्षिण आफ्रिकेचा एडीन माक्ररम आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. माक्ररम सध्या 792 रेटिंग घेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर मोहम्मद रिझवान हा 825रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे.
भारताच्या 32 वर्षाच्या सूर्याने टी 20 थोड्याच कालावधीत चांगली प्रगती केली आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत 29 टी 20 सामने खेळले असून त्यात 37.26 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 173.83 इतका आहे. त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात देखील स्थान मिळाले आहे. तो संघातील एक महत्वाचा फलंदाज आहे.
भारत मायदेशात ऑस्ट्रेलियासोबत अजून दोन टी 20 सामने खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध देखील भारत तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला ICC T20 Ranking मध्ये अजून वरचे स्थान मिळवण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.