ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत रिझवान टी 20 चा नवा बादशाह; किंग कोहलीही वधारला

ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत रिझवान टी 20 चा नवा बादशाह; किंग कोहलीही वधारला
Updated on

ICC T20 Batting Ranking : आशिया कपमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) धडाकेबाज कामगिरी करत आहे. याचा फायदा त्याला आयसीसी टी 20 रँगकिंगमध्ये देखील झाला आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला अव्वल स्थानावरून खाली खेचत स्वतः टी 20 चा नवा बादशाह झाला आहे. बाबर आझमला आशिया कपमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे मोहम्मद रिझवानने आशिया कपमध्ये 3 सामन्यात 192 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान पाठोपाठ भारताचा रन मशिन विराट कोहली (Virat Kohli) देखील फॉर्ममध्ये आला असून त्यानेही आशिया कपमध्ये पाठोपाठ 2 अर्धशतके ठोकली आहेत. त्यानेही आपल्या टी 20 रँगिंगमध्ये सुधारणा केली आहे.

ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत रिझवान टी 20 चा नवा बादशाह; किंग कोहलीही वधारला
Boycott IPL : धोनी परत ये! राहुल - पंतला नारळ द्या, नेटकरी रोहितच्या नेतृत्वावरही भडकले

मोहम्मद रिझवान ICC T20 Batting Ranking मध्ये 815 अंकांसह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर बाबर आझम 794 अंकांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवची तीन स्थानांनी घसरण झाली असून तो 775 अंक मिळवत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. दरम्यान, नुकताच फॉर्ममध्ये आलेला विराट कोहलीने आशिया कपमध्ये पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी केल्या. याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. त्याच्या स्थानात 6 अंकांची सुधारणा झाली असून तो आता 542 अंकांसह 29 व्या स्थानावर पोहचला आहे.

ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत रिझवान टी 20 चा नवा बादशाह; किंग कोहलीही वधारला
Arshdeep Singh : 'अर्शदीप पाजी जास्त लोड घेऊ नको' गद्दार कमेंटनंतर रिचा चढ्ढाची प्रतिक्रिया

आशिया कपमधील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारत आता आशिया कप सुपर 4 मधील आपला शेवटचा सामना अफगाणिस्तानविरूद्ध गुरूवारी खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणते कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सुपर 4 मध्ये भारताला संपूर्ण क्षमतेने आपला खेळ दाखवता आला नाही. भारत पाकिस्तान आणि श्रीलंकाविरूद्ध पराभूत झाला. भारताचे अजून वर्ल्डकपसाठीचे कॉम्बिनेशन सेट झालेले नाही असे दिसते. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.