ICC T20 Men's Players Ranking : आयसीसीने नुकतेच टी 20 पुरूष खेळाडू रँकिंग प्रसिद्ध केली. गेल्या काही आयसीसी रँकिंगमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यात टी 20 बॅटिंग अव्वल स्थानासाठी रस्सीखेच सुरू होती. सूर्या मोहम्मद रिझवानचे अव्वल स्थान हिसकावून घेण्याच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रँकिंगनुसार मोहम्मद रिझवानने आपले पहिले स्थान अजून पक्के केले आहे. त्याच्याकडे सध्या 861 रेटिंग पॉईंट्स आहेत. दुसरीकडे सूर्यकुमार यादव 838 रेटिंग पॉईंट घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे.
मोहम्मद रिझवानला न्यूझीलंमधील ट्राय सिरीजमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये फायदा झाला. त्याने आपली सूर्यकुमारवरील आघाडी अजून वाढवली. सध्या सूर्यकुमार रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तो आता पाकिस्तानविरूद्ध 23 ऑक्टोबरला होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमधील सामन्याची वाट पाहत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचे अव्वल फलंदाज केएल राहुल 13 व्या, विराट कोहली 15 व्या तर कर्णधार रोहित शर्मा 16 व्या क्रमांकावर आहेत. टी 20 ऑल राऊंडर रँकिंगमध्ये भारताचा हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर कायम आहे. त्याच्याकडे 173 रेटिंग पाँईंट्स आहेत.
या यादीत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये झालेल्या ट्राय सिरीजमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने मालिकेतील बांगलादेशच्या शेवटच्या दोन सामन्यात पाठोपाठ अर्धशतकी खेळी केली. शाकिबने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचे अव्वल स्थान हिसकावून घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.