Pak vs Eng Final : पावसामुळे अंतिम सामना रद्द ? मेलबर्नमध्ये सलग दोन दिवस पाऊस

इंग्लंड-पाकला पुन्हा विजेतेपदाची संधी; अन्यथा पावसामुळे संयुक्त विजेतेपद
icc t20 world cup 2022 final between england vs pakistan at the melbourne rain weather forecast pak vs eng cricket
icc t20 world cup 2022 final between england vs pakistan at the melbourne rain weather forecast pak vs eng cricket sakal
Updated on

Pak vs Eng Final T20 World Cup 2022 : १२ फॉर्म इंग्लंडच्या, तर इतिहास पाकच्या बाजूने अशी स्थिती आहे द्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याची. दोन्ही संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकण्याच्या मार्गावर आहेत, परंतु हे सर्व वरुणराजाच्या हाती आहे. सोमवारी राखीव दिवशीही पावसाचा अंदाज आहे, परंतु विजेतेपदाचा फैसला होण्यासाठी किमान दहा-दहा षटकांचा तरी खेळ होण्यासाठी संयोजकांची धडपड आहे.

icc t20 world cup 2022 final between england vs pakistan at the melbourne rain weather forecast pak vs eng cricket
Eng Vs Pak Final : असली-नकली 'मिस्टर बीन' मध्ये लढाई, फायनल सामन्याआधी मीम्सचा पाऊस

ध्यानीमनी स्वप्नी नसताना पाकचा संघ उपांत्य फेरीत आला; मात्र उपांत्य फेरी खेळण्याची हाती आलेली संधी त्यांनी घट्ट पकडून ठेवली. न्यूझीलंडला पराभूत करताना त्यांनी स्पर्धेतील आपला सर्वोत्तम खेळ केला. 'कसान म्हणून संघात असताना स्वतःची कामगिरी झाली नाही तर दडपण येते हे सत्य आहे. नेमकी उपांत्य सामन्यात माझी फलंदाजी बरी झाली... अर्धशतकी खेळी करता आली आणि संघाच्या यशात खेळाडू म्हणून योगदान देता आले याचे थोडे समाधान वाटले, बाबर आझम सांगून गेला. बाकी संघ चांगली कामगिरी करत असताना बाबर आझमची बॅट बोलत नव्हती. उपांत्य सामन्यातील खेळीने ती शंकाही दूर झाली आहे.

अंतिम सामना २०-२० षटकांचा असला तरी खरी मेख पहिल्या सहा षटकांत कोण कसे खेळते याची आहे का, असे विचारता बाबर आझम म्हणाला, काही प्रमाणात हे सत्य आहे की पॉवर प्लेच्या षटकांचे महत्त्व मोठे आहे. आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही करताना त्याच सहा षटकांनी सामन्यात मुसंडी मारायला मदत केली आहे.' शाहीन शाह आफ्रिदी नव्या चेंडूने मारा चालू करताना सलामीच्या फलंदाजांना बाद करायचा प्रयत्न करतो त्याला बटलर हेल्सची जोडी काय प्रत्युत्तर देते हे बघणे मजेदार ठरणार आहे.

icc t20 world cup 2022 final between england vs pakistan at the melbourne rain weather forecast pak vs eng cricket
Babar Azam : ''पाकिस्तान जिंकल्यास 2048 मध्ये बाबर पाकचा प्रधानमंत्री''

दुसरीकडे पाकिस्तान संघाची ताकद बाबर आझम- मोहमद रिझवानच्या सलामीच्या जोडीत आहे. इंग्लंडचे गोलंदाज त्याच जोडीला बाद करण्यात किंवा त्यांना शांत राखण्यात यशस्वी होतात हा अंतिम सामन्यातील औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

इंग्लंड असो वा पाकिस्तान, दोनही संघांमध्ये दर्जेदार लेग स्पीन गोलंदाज आहे. शादाब खान आणि आदील रशीद संघाकरिता फार मोलाची कामगिरी करत आहेत. अंतिम सामन्यात कोणत्या लेग स्पीन गोलंदाजाला यशाचा मार्ग सापडतो यावर संघाचे भवितव्य विसंबून असेल. पावसाळी हवामान कायम राहणार असल्याने मैदान कर्मचाऱ्यांनी फलंदाजीकरिता पोषक खेळपट्टी बनवायचा प्रयत्न केला तरी काही ना काही मदत वेगवान गोलंदाजांना होणार आहेच.

icc t20 world cup 2022 final between england vs pakistan at the melbourne rain weather forecast pak vs eng cricket
FIFA World Cup : विश्वकरंडकासाठी अर्जेंटिनाचा संघ जाहीर
  • काय आहे हवामानाचा अंदाज

    • १३ नोव्हेंबर :

      पूर्णपणे ढगाळ वातावरण. १०० टक्के पावसाची शक्यता. ५ ते १० मिमी. पाऊस पडू शकेल. सकाळच्या सत्रात ताशी २५ ते ३५ कि.मी. वेगाने, त्यानंतर ताशी १५ ते २० कि.मी. वेगाने वारे पावसाची तीव्रता वादळी असू शकेल.

    • १४ नोव्हेंबर (राखीव दिवस) :

      ९५ टक्के पावसाची शक्यता. ५ ते १०. मिमी पाऊस पडू शकेल. सकाळच्या सत्रात ताशी २५ ते ४० आणि त्यानंतर दुपारी ताशी १५ ते २५ कि.मी वेगाने वारे वाहतील. पावसाचे स्वरूप या दिवशीही वादळी असण्याची शक्यता.

रेन रेन गो अवे....

रविवारी हवामान खात्याने भरपूर पावसाची 'शक्यता वर्तवलेली असल्याने खेळाडू, संयोजक आणि क्रिकेट चाहते चिंतेत आहेत. कमीत कमी १०-१० घटकांचा सामना करण्याकरिता संयोजक धडपड करणार आहेत. त्याकरिता राखीव दिवसाचा खेळ दुपारी थोडा उशिराने सुरू करून चार अतिरिक्त तास सामना पूर्ण होण्याकरिता ठेवले गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()