ICC T20 Rankings Indian Players: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यात इशान किशन आणि दीपक हुड्डा यांनी चमकदार कामगिरी केली. भारताचा सलामीवीर इशान किशनने 10 स्थानांची झेप घेत 23 व्या स्थानावर पोहोचले आहे, तर दीपक हुड्डाने गुरुवारी जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत टॉप-100 मध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.
मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इशान किशन आणि दीपक हुड्डा या दोन्ही फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केल्यानंतर गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचले. हुड्डा 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्यानंतर 40 स्थानांनी चढून 97 व्या स्थानावर पोहोचला. फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतरही सूर्यकुमार यादवने या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा नवा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या नऊ स्थानांनी सुधारणा करत 76व्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात श्रीलंकेसाठी अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या वानिंदू हसरंगा (1/22) याने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले.
कसोटी क्रमवारीत या फलंदाजाचा दबदबा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही मार्नस लॅबुशेनने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र क्रमवारीत त्याचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी सहकारी स्टीव्ह स्मिथ, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि माजी न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला त्यांचे रेटिंग गुण वाढवण्यात यश आले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा विल्यमसन 2 स्थानांच्या सुधारणासह क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.