ICC Test Rankings: टीम इंडियाच्या शिलेदारांची यादीत घसरण

ICC Test Rankings: टीम इंडियाच्या शिलेदारांची यादीत घसरण 'कूल कॅप्टन' केन विल्यमसन अव्वलस्थानी; पाहा Top 10 ची यादी ICC Test Ranking Kane Williamson Tops the List Rishabh Pant Ravindra Jadeja falls down
Team-India
Team-India
Updated on

'कूल कॅप्टन' केन विल्यमसन अव्वलस्थानी; पाहा Top 10 ची यादी

लंडन: नुकत्याच झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC 2021) न्यूझीलंडने (New Zealand) टीम इंडियाला (Team India) धूळ चारली आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विजयी होत न्यूझीलंडने मानाची गदा (Mace) आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. त्यानंतर आज ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमावारीत (ICC Test Rankings) देखील न्यूझीलंडच्या चाहत्यांना (Fans) आनंदाची बातमी मिळाली. दीर्घकाळ अव्वल स्थानासाठी झगडणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) मागे टाकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले. भारतीय खेळाडूंची (Indian Players) मात्र ताज्या क्रमवारीत काही ठिकाणी घसरण झाली. (ICC Test Ranking Kane Williamson Tops the List Rishabh Pant Ravindra Jadeja falls down)

Team-India
भारताचं WTC 2 चं वेळापत्रक जाहीर; या देशांसोबत मुकाबला

फलंदाजांच्या क्रमावारीत केन विल्यमसनने ९०१ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. त्याने ८९१ गुण असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला खाली ढकलले. यादीत रोहित शर्माला एका स्थानाची बढती मिळाली. त्याने सहाव्या स्थानावर असलेल्या ऋषभ पंतला एका स्थानाने खाली ढकलले. न्यूझीलंडच्या हेन्री निकल्सचीदेखील दोन स्थानांनी घसरण झाली. याशिवाय, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल यांची यादीत घसरण झाली तर अजिंक्य रहाणेला मात्र क्रमवारीत बढती मिळाली.

Top-10
Top-10
Team-India
'माझं सुटलेलं पोट त्यावेळी का नाही दिसलं?'; मलिंगाचा सवाल

गोलंदाजांच्या यादीत Top 5 मध्ये कोणताही बदल झाला नाही. Top 10 मध्ये केवळ भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन दुसरे स्थान राखून आहे. बाकी एकाही भारतीय गोलंदाजाचा पहिल्या १० च्या यादीत समावेश नाही. इतर क्रमवारीत भारताच्या इशांत शर्माला क्रमवारीत बढती मिळाली असून तो १६व्या स्थानी पोहोचला आहे. पाठोपाठ क्रमवारीत घसरण झालेला रविंद्र जाडेजा १७व्या, आपलं स्थान कायम राखणारा मोहम्मद शमी १८व्या तर क्रमवारीत घसरण झालेला जसप्रीत बुमराह १९व्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.