दुबई : नवीन वर्ष २०२२ च्या पहिल्याच महिन्यात आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) मोठे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंड विरुद्धची अॅशेस मालिका (Ashes Series) ४ - ० अशी जिंकली. त्यामुळे त्यांच्या कसोटी रँकिंगमध्ये चांगलीच सुधारणा झाली. आता ऑस्ट्रेलिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाचे ११९ पॉईंट झाले आहेत. ते तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या (India) ३ पॉईंट्सनी पुढे आहेत.
दुसरीकडे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका (India vs South Africa) २ - १ ने गमावली. त्याचा फटका भारताला आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) बसला असून आता भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला विजेता न्यूझीलंडने आपले दुसरे स्थान अबाधित राखले आहे. त्यांनी बांगलादेश विरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका १ - १ अशी बरोबरीत सोडवली होती.
अॅशेस मालिकेत सपाटून मार खाणारी इंग्लंड (England) १०१ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर भारताचा मायदेशात पराभव करणारी साऊथ आफ्रिका पाचव्या स्थानावर आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) टेस्ट रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झाली आहे. ते आता सहाव्या स्थानावर गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.