ICC U-19 World Cup Team India Schedule : 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेची आजपासून (दि. 19) सुरूवात झाली. यंदाचा 19 वर्षाखालील वर्ल्डकप श्रीलंका येथे होणार होता. मात्र ऐनवेळी त्याचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे सोपवण्यात आले. भारतीय संघ उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणार असून भारतीय संघ आपली मोहीम शनिवारपासून सुरू करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे.
भारतीय संघाने 19 वर्षाखालील वर्ल्डकपचे 2002, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. यंदा पुन्हा एकदा भारतीय संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत चार ग्रुप केले आहेत. यात चार चार संघ समाविष्ट असणार आहेत.
प्रत्येक ग्रुपमधील पहिले तीन संघ सुपर सिक्समध्ये पोहचणार आहे. सुपर सिक्स फेरी ही 30 जानेवारीपासून सुरू होईल तर पहिली सेमी फायनल ही 6 आणि दुसरी सेमी फायनल ही 8 फेब्रुवारीला होणार आहे. तर अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
भारतीय संघाचा समावेश ग्रुप अ मध्ये आहे. भारतासोबतच या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड आणि युनायटेड स्टेट्स या संघांचा समावेश आहे.
भारताचा पहिला सामना बांगलादेशसोबत 20 जानेवारीला होणार आहे. तर दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडसोबत होणार आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना हा 28 जानेवारीला युनायटेड स्टेट्ससोबत होईल.
दय सहारन (कर्णधार) , अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रूद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव, स्वामी कुमार पांडे, मुरूगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी
महफुजूर रहमान रब्बी (कर्णधार), आशिकुर रहमान शिबली, जिशान आलम, आरिफुल इस्लाम, मोहम्मद शिहाब जेम्स, अहरार अमीन, शेख परवेज जिबोन, वासी सिद्दीकी, मारूफ एम, चौधरी मोहम्मद रिजवान, आदिल बिन सिद्दीक, मोहम्मद अशरफुज्जामन, मोहम्मद रफी उज्जामन रफी, रहनत दौला बोरसन, इकबाल हुसैन एमन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.