U 19 WC 2022 : बांगलादेशचा धुव्वा; युवा टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

India U19 vs Bangladesh U19, Super League Quarter-Final 2
India U19 vs Bangladesh U19, Super League Quarter-Final 2 Sakal
Updated on

India U19 vs Bangladesh U19, Super League Quarter-Final 2 : अँटिग्वाच्या मैदानात रंगलेल्या सुपर लीग क्वार्टर फायनलमध्ये युवा टीम इंडियाने बाजी मारली. बांगलादेशनं दिलेल्या 112 धावांचे आव्हान परतवून लावत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे. तांबेनं उत्तुंग षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. दुसऱ्या बाजूला कर्णधार यश धूलही नाबाद परतला.

युवा टीम इंडियाचा कर्णधार यश धूलनं (Yash Dhull) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. SM Meherob ती 48 चेंडूतील 30 धावांची खेळी आणि Ashiqur Zaman याच्या 16 धावा वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदालाजा मैदानात तग धरता आला नाही. परिणामी त्यांचा डाव 37.1 षटकांत 111 धावांतच आटोपला होता.

बांगलादेशनं दिलेल्या माफक धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर हरनूर सिंगला शाकिबनं खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर रघुवंशी आणि शैक रशीदनं दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करुन सामना भारतीय संघाच्या बाजूनं झुकला. अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करणारा सलामीवीर रघुवंशी 65 चेंडूत 44 धावा करुन तंबूत परतला. त्यापाठोपाठ रशीदही 26 धावांवर चालता झाला. सिद्धार्थ यादव 6 धावा करुन परतल्यानंतर राज बावा मैदानात उतरला. पण त्याला खातेही उघडता आले नाही. माफक धावांचा पाठलाग करताना भारताचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र कर्णधार यश धूल 20 (26) आणि कौशल तांबेनं 11(18) नाबाद राहून संघाला 5 विकेट्सनं विजय मिळवून दिला.

97-5 : राज बावाला खातेही उघडता आले नाही, पाच चेंडूचा सामना करुन तो शून्यावर माघारी फिरला

82-4 : सिद्धार्थ यादव अवघ्या 6 धावांची भर घालून तंबूत परतला

75-3 : शैक राशीदच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का, त्याने 59 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या

70-2 : रघुवंशीच अर्धशतक हुकल, 65 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने 44 धावा करुन तो तंबूत परतला

0-1 : हरनूर सिंगच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का, शाकिबनं त्याला खातेही उघडू दिले नाही.

111-10 : हसन शकीबला बाद करत राजवर्धन याने बांगलादेशचा खेळ केला खल्लास, टीम इंडियासमोर 112 धावांचे आव्हान

108-9 : अशिकूर जमान 29 चेंडूत 16 धावा करुन रन आउट

106-8 : रघुवंशीनं फोडली SM मेहरोब 30 (48) अन् अशिकूर जमान जोडी. या दोघांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली

33 व्या षटकात रवी कुमारनं टाकलेल्या व्हाईड चेंडूच्या रुपात एका अवांतर धावेसह बांगलादेशनं कशी बशी शंभरी गाठली.

56-7 : दबावात असलेल्या बांगलादेशनं रन आउटच्या रुपात गमावली विकेट, सर्वाधिक 17 धावा करणारा मोल्लाह तंबूत परतला

50-6 : रकिबुल हसनच्या रुपात बांगलादेशला सहावा धक्का, कौशल तांबेनं त्याला 7 धावांवर केलं चालतं

37-5 : Md फहिमला विक्कीनं खातही उघडू दिलं नाही, बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत

37-4 : विक्की ओस्तवालला पहिलं यश, अरिफुल इस्लाम 9 धावा करुन तंबूत

पहिल्या पावर प्लेमध्ये बांगलादेशनं 20 धावांच्या मोबदल्यात गमावल्या तीन विकेट्स

14-3 : नबीलही 7 धावा करुन तंबूत परतला, तिसरे यशही रवी कुमारच्या खात्यात, रवीनं पहिल्या चार षटकात 4 धावा खर्च करुन तिसरी विकेट मिळवली आहे.

12-2 : युवा टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात, सहाव्या षटकात बांगलादेशला आणखी एक धक्का, रवी कुमारच्या खात्यात आणखी एक विकेट

3-1 : बांगलादेशला पहिला धक्का; दुसऱ्याच षटकात रवी कुमारनं इस्लामला 2 (4) केल बोल्ड

असे आहेत दोन्ही संघ

Bangladesh U19 (Playing XI): महफिजूल इस्लाम (Mahfijul Islam), इफ्तखर हुसेन इफ्ती (Iftakher Hossain Ifti), प्रणतिक नवरोझ नबील (Prantik Nawrose Nabil), मोल्लाह (Aich Mollah), मोहम्मद फहीम (Md Fahim)(w), अरिफूल इस्लाम (Ariful Islam), एसएम मेहरोब (SM Meherob), रकिबूल हसन (Rakibul Hasan) (c), अशिकर झमान (Ashiqur Zaman), तनझिम हसन शाकीब (Tanzim Hasan Sakib), रिपन (Ripon Mondol).

India U19 (Playing XI): रघुवंशी (Angkrish Raghuvanshi), हरनूर सिंग (Harnoor Singh), शैख राशिद (Shaik Rasheed), यश धूल (Yash Dhull) (c), राज बावा (Raj Bawa), सिद्धार्थ यादव (Siddarth Yadav), कौशल तांबे (Kaushal Tambe), दिनेश बाना (Dinesh Bana) (w), विक्की ओस्तवाल (Vicky Ostwal), राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar), रवी कुमार (Ravi Kumar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.