U19 World Cup 2022 : युवा टीम इंडिया सज्ज; सामना कधी कुठे अन् कसा पाहायचा?

India U19
India U19Sakal
Updated on

ICC Under 19 World Cup 2022 : युवा टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2022 च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीनं सुरुवात करेल. आशियाई चॅम्पियन पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत युवा टीम इंडिया प्रबळ दावेदारापैकी एक आहे. या स्पर्धेपूर्वी संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएई मध्ये झालेल्या अंडर 19 आशियाई कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे युवा टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. (How To Watch IND vs SA World Cup Match Live Streaming)

यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखालील संघ या स्पर्धेत ब गटात आहे. भारताच्या गटात युगांडा, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. चार गटात चार संघ असे एकूण 16 संघ जेतेपदासाठी रिंगणात उतरणार आहेत. चार ग्रुपमधील टॉपचे दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. साखळी फेरीतील सामने हे 22 जानेवारीपर्यंत खेळवण्यात येतील. 25 जानेवारीपासून प्लेट ग्रुप मॅचला सुरुवात होईल. 5 फेब्रुवारीला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारताच्या गटातील युगांडा पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेत आहे.

आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने आपला दबदबा राखला आहे. आतापर्यंत 2000, 2008, 2012 आणि 2018 या वर्षी झालेल्या स्पर्धेत युवा टीम इंडियाने जेतेपद पटकावले होते. याशिवाय 2016 मध्ये युवा टीम इंडियाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

स्पर्धेतील भारतीय संघाचा सामना कधी अन् कुठे?

आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत भारत 15 जानेवारी रोजी गुयानाच्या प्रोविडेंस स्टेडियमवर मैदानात उतरले. सलामीच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल. भारताचा दुसरा सामना त्रिनिदाद च्या ब्रायन लारा स्टेडियमवर 19 जानेवारीला ऑयर्लंड आणि याच मैदानात 22 जानेवारीला टीम इंडिया युगांडासोबत भिडेल.

सामन्याची वेळ काय?

वेस्टइंडीजमध्ये रंगलेल्या या स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व तीन लढती भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरु होतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याशिवाय स्पर्धेत इतर सामनेही याच वेळेत रंगणार आहेत.

लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येतील सामने?

आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील भारताचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेत पाहता येतील.

IND vs SA लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे?

डिज्नी+हॉटस्टार अ‍ॅपवरही लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय आपल्या सकाळच्या लाइव्ह अपडेट्स https://www.esakal.com/krida च्या माध्यमातूनही तुम्ही घडामोडी जाणून घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()