ICC T20 World Cup New Logo : सळसळत्या उर्जेचे प्रतीक! आयसीसीकडून टी 20 वर्ल्डकपच्या नव्या लोगोचे अनावरण

ICC T20 World Cup New Logo
ICC T20 World Cup New Logoesakal
Updated on

ICC T20 World Cup Logo : वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्डकपला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. सर्व सहभागी देश आपल्या संघाची बांधणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, आयसीसीने आज टी 20 वर्ल्डकपचा नवा लोगो प्रसिद्ध केला आहे.

ICC T20 World Cup New Logo
Ind vs Sa : दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच भारतीय खेळाडूंनी डोक्यावर घेतली बॅग अन्... BCCI ने शेअर केला 'तो' व्हिडिओ

आयसीसीने आज अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं. त्यात ते म्हणातात, 'सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट स्पर्धेनं नुकतीच कात टाकली आहे. आता आयसीसी टी 20 वर्ल्डकपला नवीन ओळख मिळणार आहे. हा क्रिकेट प्रकार हा त्याच्या वेगवान घडामोडींसाठी प्रसिद्ध आहे. आता याला एक डायनामिक ओळख मिळणार आहे. ही ओळख या खेळाची सळसळती उर्जा दर्शवणारी असणार आहे.'

ICC T20 World Cup New Logo
AUS vs PAK : वांशिक शिवीगाळ? पाकिस्तानच्या सराव सामन्यात ब्रॉडकास्टरनं केली मोठी चूक अन् वादाला फुटलं तोंड...

आयसीसीच्या या नव्या लोगोमध्ये बॅट, बॉल आणि खेळातील उर्जेचा कल्पकपणे मिश्रण केले आहे. टी 20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीला फार महत्व आहे. त्याचा वापर या लोगोत करण्यात आला आहे. बॅट स्विंगमुळे सामन्याचा निकाल कसा बदलू शकतो याचं हे प्रतीक आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्डकप हा जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये होणार आहे. या स्पर्धेत जवळपास 20 संघ पात्र झाले असून या संघाचे विभागणी चार ग्रुपमध्ये केली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 5 संघांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.