दुबई : बांगलादेशमध्ये नवे सरकार स्थापन झालेले असले तरी तेथील अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीस सुरू होत असलेल्या महिला टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य अधांतरी आहे. भारताने आयोजनास नकार दिल्यानंतर आता ही स्पर्धा दुबई-अबुधाबी येथे होण्याची शक्यता वाढली आहे.