आई कुठे काय करते? पाक कॅप्टन लेकीला कडेवर घेऊन आली मॅच खेळायला

ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women  Pakistan captain Bismah Maroof With Baby  Girl
ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women Pakistan captain Bismah Maroof With Baby Girlicc
Updated on

पाकिस्तानची बॅटर आणि कर्णधार बिस्माह मारुफ (Pakistan captain Bismah Maroof ) हिचा एक खास फोटो आयसीसीने शेअर केलाय. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना माउंट माउंनगुनाईच्या मैदानात सुरु आहे, भारतीय संघाविरुद्ध भिडण्यापूर्वी बिस्माह मारुफ लेकीला कडेवर घेऊन सामन्याच्या ठिकाणी पोहचल्याचे पाहायला मिळाली. पाकिस्तानचे भारताविरुद्धचे खराब रेकॉर्ड सुधारुन संघाला विजय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असेल.

महिला वर्ल्ड कप स्पर्धा 2021 मध्ये नियोजित होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडले. याचा बिस्माह मारुफला फायदा झाला. कारण एप्रिल 2021 मध्ये बिस्बाहनं मातृत्वसाठी (motherhood) क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीसाठी संघापासून दूर होत असल्याची माहिती तिने दिली होती. या निर्णयासाठी तिने दक्षिण आफ्रिकेचा दौराही सोडला होता.

तिच्या अनुपस्थितीत जवेरिया खान (Javeria Khan) हिने पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले होते. ऑगस्टमध्ये मारुफनं मुलीला जन्म दिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मातृत्व रजा मंजूर केलेली (maternity leave ) मारुफ ही पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटरही ठरली होती. पुन्हा संघात कमबॅक केल्यानंतर पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठी संघाची धूरा तिच्या खांद्यावर दिली आहे.

ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women  Pakistan captain Bismah Maroof With Baby  Girl
ICC Womens World Cup : पाक विरुद्ध स्मृतीची संयमी फिफ्टी; पण...

एप्रिल 2021 मध्ये बिस्बाहनं मातृत्वसाठी (motherhood) क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीसाठी संघापासून दूर होत असल्याची माहिती तिने दिली होती. या निर्णयासाठी तिने दक्षिण आफ्रिकेचा दौराही सोडला होता. तिच्या अनुपस्थितीत जवेरिया खान (Javeria Khan) हिने पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले होते. ऑगस्टमध्ये मारुफनं मुलीला जन्म दिला. याची माहितीही तिने ट्विटच्या माध्यमातून दिली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मातृत्व रजा मंजूर केलेली (maternity leave ) मारुफ ही पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटरही ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.