VIDEO : आलिया नॉट रिचेबल; डोळ्याची पापणी लवायच्या आत रिचानं काढला काटा

ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women
ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women Sakal
Updated on

ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women : महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामी लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शफालीच्या रुपात भारतीय संघाला 14 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर स्मृती-दीप्तीने दिमाखदार खेळ करत संघाचा डाव सावरला. पुन्हा मध्यफळीत गोंधळ उडला. मिताली राज, हरमनप्रीत कौरसह विकेट किपर फलंदाज रिचा घोष (Richa Ghosh) स्वस्तात माघारी फिरला. रिचा अवघ्या एका धावेची भर घालून बोल्ड झाली. नादियानं तिची विकेट घेतली. धावांची उणीव तिने यष्टीमागे जबरदस्त कामगिरी करत भरुन काढली.

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा 245 धावा करताना पाकिस्तान महिला संघाचा डाव कोलमडला. एकाही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. रिचा घोषनं यष्टीमागे सुंदर कॅचसह एक अप्रितम स्टम्पिंग केल्याचा नजराणा पाहायला मिळाला. राजश्री गायकवाडच्या (Rajeshwari Gayakwad) गोलंदाजीवर तिने डोळ्याची पापणी लवायच्या आत तिने अलिया रियाज (Aliya Riaz) हिला तंबूचा रस्ता दाखवला. अलियाने 23 चेंडूत 11 धावा केल्या. या सुरेख स्टम्पिंगशिवाय रिचा घोषनं यष्टीमागे चार कॅच घेतले. तिने पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडण्यात हातभार लावला.

ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women
INDW vs PAKW: पाकची पाटी कोरीच; मोठ्या विजयाने भारताची वर्ल्डकप मोहिम सुरू
ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women
Video: धमकी प्रकरणाला वेगळे वळण; साहावर 'त्या' पत्रकाराचा गंभीर आरोप

स्मृती मानधना 52(75), स्नेहा राणा 40 (57)* आणि पुजा वस्त्राकर 67 (59) यांच्या अर्धशतकासह दीप्ती शर्मानं केलेल्या उपयुक्त 40 (57) धावांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 244 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघ 137 धावांतच आटोपला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 107 धावांनी विजय नोंदवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाडनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या.,स्नेह राणा आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी दोन दोन तर दीप्ती आणि मेघना याने प्रत्येकी एक एक विकेट मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.